इलेक्ट्रिकल कामांच्या दरम्यान

सुरक्षेच्या जोखमींना कसे टाळता

येईल?

25 ऑगस्ट, 2020

इलेक्ट्रिकल काम हे तुमच्या घराच्या बांधकामाच्या काही अंतिम टप्प्यांपैकी एक काम आहे. पण, या टप्प्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण एखाद्या अपघातामुळे गंभीर समस्या व सुरक्षेच्या जोखमी उदभवू शकतात.

इथे महत्वपूर्ण इलेक्ट्रिकल सुरक्षेच्या काही टिप्स दिल्या आहेत.

  घराचे बांधकाम सुरु करण्याआधी, सर्व वायरिंग आणि इलेक्ट्रिकल आउटलेट्सच्या स्थानाचे तुम्ही नियोजन केले असण्याची खात्री करा.

  तुमच्या सर्व इलेक्ट्रिकल कामासाठी प्रमाणीकृत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा सल्ला घ्या.

  तुमच्या घरासाठी योग्य प्रकारे अर्थिंग केल्याची खात्री करा. याची पुष्टी करण्यात तुमचा इंजिनिअर मदत करेल.

  दर्जेदार इलेक्ट्रिकल सामग्री मिळवण्यासाठी खरेदी आधी आयएसआय मार्क तपासा.

  एकाच इलेक्ट्रिकल पॉईंटवर अनेक कनेक्शन घेणे टाळा, तुमच्या सर्व इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी फ्यूज वापरा.

  सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आणि पॉईंट्स पाण्याच्या स्त्रोतापासून दूर ठेवा

  सखोल तपासणी करा आणि अटेंड न केलेल्या (दुर्लक्षित) कोणत्याही लाईव्ह वायर नसण्याची अखेरीस खात्री करा.

तुमच्या घराचे इलेक्ट्रिकल काम करताना अडचणी टाळण्यासाठी या सुरक्षा टिप्स लक्षात ठेवा


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा