संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करावॉल वॉटरप्रूफिंग आणि त्याचे प्रकार: एक सर्वसमावेशक मार्गदर्शक

महागडी दुरुस्ती टाळण्यासाठी आणि आरोग्यकारक सजीव वातावरण राखण्यासाठी आपल्या अंतर्गत आणि बाह्य भिंती वॉटरप्रूफ करणे महत्वाचे आहे. भिंतींमधील ओलाव्यामुळे इमारतीच्या संरचनेचे नुकसान होऊ शकते आणि बुरशीची वाढ होऊ शकते, ज्यामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर आपल्या घराचे मूल्य देखील कमी होते. अनेक प्रकारच्या वॉल वॉटरप्रूफिंग पद्धती उपलब्ध आहेत, प्रत्येक पद्धत वेगवेगळ्या गरजा आणि बजेटमध्ये बसण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या ब्लॉगमध्ये, आपण आपल्या भिंतींसाठी काही सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी वॉटरप्रूफिंग पद्धतींवर चर्चा करूया.

Share:


महागडी दुरुस्ती टाळण्यासाठी आणि आरोग्यकारक राहणी वातावरण राखण्यासाठी आपल्या अंतर्गत आणि बाह्य भिंती वॉटरप्रूफ करणे महत्वाचे आहे. भिंतींमधील ओलाव्यामुळे इमारतीच्या संरचनेचे नुकसान होऊ शकते आणि बुरशीची वाढ होऊ शकते, ज्यामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर आपल्या घराचे मूल्य देखील कमी होते. अनेक प्रकारच्या वॉल वॉटरप्रूफिंग पद्धती उपलब्ध आहेत, प्रत्येक पद्धत वेगवेगळ्या गरजा आणि बजेटमध्ये बसण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या ब्लॉगमध्ये, आपण आपल्या भिंतींसाठी काही सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी वॉटरप्रूफिंग पद्धतींवर चर्चा करूया.वॉल वॉटरप्रूफिंग म्हणजे काय?

वॉल वॉटरप्रूफिंग हे इमारतीच्या भिंतींमध्ये पाणीचा प्रवेश रोखण्यासाठी वापरले जाणारे एक विशेष तंत्र आहे. यात पाणी बाहेर ठेवणारा वॉटरप्रूफ अडथळा तयार करण्यासाठी विविध वॉटरप्रूफिंग मटेरियल आणि पद्धतींचा वापर केला जातो. विशेषतः अतिवृष्टी, उच्च आर्द्रता किंवा ओलावाच्या इतर स्त्रोतांच्या संपर्कात असलेल्या भागांसाठी हा संरक्षणात्मक उपाय महत्वाचा आहे.

 

वॉटरप्रूफिंग बाह्य आणि अंतर्गत दोन्ही भिंतींवर लागू केले जाऊ शकते आणि ते गळती, ओलसरपणा, बुरशीची वाढ आणि संरचनात्मक नुकसान यासारख्या पाण्याशी संबंधित समस्यांविरुद्ध एक प्रभावी संरक्षक म्हणून कार्य करते. भिंती सील करून आणि पाण्याचा शिरकाव रोखून, भिंतीचे वॉटरप्रूफिंग हे इमारतीची अखंडता राखण्यास मदत करेल आणि वास्तूचे दीर्घायुष्य सुनिश्चित करेल.


वॉल वॉटरप्रूफिंगचे फायदे1. पाण्याच्या नुकसानापासून संरक्षण

वॉल वॉटरप्रूफिंगचा मुख्य फायदा म्हणजे इमारतींना पाण्याशी संबंधित नुकसानापासून वाचवण्याची त्याची क्षमता. जलप्रतिबंधक अडथळा निर्माण करून, ते भिंतींमध्ये पाणी मुरण्यापासून रोखते, ज्यामुळे अन्यथा संरचनात्मक घटक कुजणे, सडणे आणि खराब होणे असे प्रकार घडू शकतात. विशेषत: अतिवृष्टी किंवा पूरप्रवण भागात हे संरक्षण महत्त्वाचे ठरते.

 

2. बुरशीची वाढ रोखते

दमट आणि ओलसर परिसर हा बुरशीची पैदास होण्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे घरातील हवेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. भिंतींसाठी वॉटरप्रूफ कोटिंग ओलावा निर्माण होण्यास प्रतिबंधित करते, ज्यामुळे भिंती आणि इतर पृष्ठभागांवर सहजपणे बुरशीची वाढ होत नाही.

 

3. संरचनात्मक अखंडता सुधारते

जेव्हा पाणी भिंतींमध्ये शिरते तेव्हा ते कालांतराने इमारतीची संरचनात्मक अखंडता कमकुवत करू शकते. वॉटरप्रूफिंगमुळे भिंती मजबूत होतात, त्यांची बाह्य शक्तींचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते आणि संरचनेची एकंदर स्थिरता सुनिश्चित होते.

 

4. किफायतशीर उपाय

वॉल वॉटरप्रूफिंगमधील सुरुवातीची गुंतवणूक लक्षणीय वाटत असली तरी दीर्घकाळासाठी हा किफायतशीर उपाय ठरतो. पाण्याचे नुकसान टाळून, मालमत्ता मालक महागडी दुरुस्ती आणि देखभालीची कामे टाळू शकतात, आणि अंतत: इमारतीच्या जीवनकाळात पैसे वाचवू शकतात.

 

5. सुधारित ऊर्जा कार्यक्षमता

वॉटरप्रूफिंगमुळे इमारतीमधील ऊर्जा कार्यक्षमतेत ही सुधारणा होऊ शकते. भिंतींमधील भेगा आणि पोकल्या सील करून, ते हवेची गळती कमी करते आणि थर्मल ब्रिजिंग (बाह्य आणि अंतर्गत वातावरणाला जोडणारा उष्णता वाहक सेतु निर्माण) ला प्रतिबंधित करते, ज्यामुळे तापन आणि शीतन प्रणाली अधिक कार्यक्षम होते.

 

6. मालमत्तेचे मूल्य वाढवते

योग्य वॉटरप्रूफिंगसह चांगली देखभाल केलेली मालमत्ता संभाव्य खरेदीदारांसाठी अत्यंत आकर्षक ठरते. हे इमारतीचे मूल्य वाढवते आणि आपण कधीही मालमत्ता बाजारात विक्रीसाठी काढल्यास तो एक महत्त्वपूर्ण विक्रीचा मुद्दा बनू शकतो.

 

वॉल वॉटरप्रूफिंग ही एक शहाणपणाची गुंतवणूक आहे जी केवळ आपल्या मालमत्तेचे रक्षणच करत नाही तर सुरक्षित आणि आरामदायक असे राहण्याचे किंवा काम करण्याचे वातावरण देखील सुनिश्चित करते. नवीन बांधकाम असो किंवा अस्तित्वात असलेली इमारत, भिंतींच्या वॉटरप्रूफिंगचे फायदे हे स्पष्ट करतात की हा संरक्षक उपाय एक लक्झरी नसून गरज आहे.


वॉल वॉटरप्रूफिंगचे प्रकार

वॉल वॉटरप्रूफिंगचे ढोबळमानाने दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: बाह्य आणि अंतर्गत वॉटरप्रूफिंग. प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या पद्धती आणि मटेरियल समाविष्ट आहेत, जे विशिष्ट गरजा आणि अटींची पूर्तता करतात.

 

 

1. बाह्य भिंतीचे वॉटरप्रूफिंगबाहेरील आर्द्रतेच्या हानिकारक परिणामांपासून इमारतींचे रक्षण करण्यासाठी बाह्य भिंतींवर केलेले वॉटरप्रूफिंग महत्त्वपूर्ण ठरते. वॉटरप्रूफिंग रसायनाचा संरक्षक थर बाह्य भिंतीला, त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास आणि पाण्याशी संबंधित संभाव्य समस्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यात मदत करतात.

 

a. सिमेंट-आधारित वॉटरप्रूफिंगया पद्धतीत सिमेंट-आधारित वॉटरप्रूफिंग कंपाऊंड(संयुगे) थेट बाह्य भिंतींवर लावली जातात. ही संयुगे एक जाड, संरक्षणात्मक थर तयार करतात जो भिंतींमध्ये पाणीला मुरण्यापासून प्रतिबंधित करतो. सिमेंटयुक्त वॉटरप्रूफिंग अत्यंत टिकाऊ असते आणि कठोर हवामानाचा सामना करू शकते, ज्यामुळे ते निवासी आणि व्यावसायिक दोन्ही इमारतींच्या बाह्य भिंतींसाठी योग्य ठरते.

 

b. लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेनभिंतींच्या बाह्य वॉटरप्रूफिंगसाठी लिक्विड वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन ही एक लोकप्रिय निवड आहे. हे द्रव स्वरुपात आवरण म्हणून लावले जाते जे भिंतींवर अखंड, लवचिक आणि वॉटरप्रूफ अडथळा तयार करते. हे मेम्ब्रेन सहजपणे विविध पृष्ठभागांसोबत आसंजीत(चिपकु) होऊ शकते आणि तडा न जाता संरचनेतील हालचाली सामावून घेऊ शकते, ज्यामुळे पाण्याच्या प्रवेशापासून उत्कृष्ट असे दीर्घकालीन संरक्षण प्राप्त होते.

 

क. लिक्विड बिटुमिनस मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंगबिटुमिनस वॉटरप्रूफिंग ही एक काळाच्या कसोटीवर योग्य ठरलेली पद्धत आहे ज्यामध्ये बाह्य भिंतींना वॉटरप्रूफ करण्यासाठी बिटुमिन-आधारित मटेरियल वापरणे समाविष्ट आहे. अधिकतम परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी हे बर्‍याचदा एकाधिक थरांमध्ये लागू केले जाते. बिटुमिनस मेम्ब्रेन अतिनील किरणांविरुद्ध प्रतिरोधक असते आणि तापमानातील बदल सहन करू शकते, ज्यामुळे ते बाह्य अनुप्रयोगांसाठी योग्य ठरते.

 

ड. मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंग

मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंग प्रणालीमध्ये सुधारित बिटुमिन, पीव्हीसी किंवा ईपीडीएम सारख्या मटेरियलपासून बनविलेले प्रीफॅब्रिकेटेड शीट(पत्रे) असतात. हे शीट बाहेरच्या भिंतींना लावले जाते, ज्यामुळे पाण्याच्या प्रवेशाविरुद्ध अखंड अडथळा तयार होतो. मेम्ब्रेन वॉटरप्रूफिंग त्याच्या इंस्टॉलेशनच्या सुलभतेसाठी ओळखले जाते आणि ते सामान्यत: जमीन खालील अनुप्रयोग आणि पायाच्या भिंतींसाठी वापरले जाते.

 

 

2. इंटीरियर वॉल वॉटरप्रूफिंगअंतर्गत भिंतीचे वॉटरप्रूफिंग हे ओलसरपणा आणि पाण्याच्या प्रवेशापासून घराच्या आंतर्गत भागाचे संरक्षण करण्यास मदत करते. वॉटरप्रूफिंग लिक्विडने घराचे संरक्षण केल्याने आरामदायक आणि आरोग्यकारक राहणी वातावरणाची खात्री होण्यास मदत होते.

 

a. पेंट आणि सीलंटवॉटरप्रूफ पेंट आणि सीलंटच्या माध्यमातून भिंतींचे इंटिरियर वॉटरप्रूफिंग करता येते. ही उत्पादने अंतर्गत भिंतींवर एक संरक्षक अडथळा तयार करण्यासाठी लागू केली जातात, हा अडथळा ओलाव्याला घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. ते काही प्रमाणात पाण्याचा प्रतिकार (जलरोधन) प्रदान करत असले, तरी बाथरूम आणि स्वयंपाकघर यासारख्या कमीतकमी पाण्याच्या प्रभाव असलेल्या जागांसाठी ते सर्वात अनुकूल आहेत.

 

b. वॉटरप्रूफ मेम्ब्रेनभिंतींच्या आतील बाजूस इंटिरियर वॉटरप्रूफ मेम्ब्रेन लावण्यात येते. ते पाण्याविरूद्ध एक मजबूत अडथळा प्रदान करतात आणि विशेषत: अशा भागात उपयुक्त असतात जेथे केवळ बाह्य वॉटरप्रूफिंग पुरेसे नसते. वॉटरप्रूफ मेम्ब्रेन सामान्यत: तळघर आणि पायाच्या भिंतींमध्ये वापरले जाते जेणेकरून पाणी आतील जागेत घुसू नये.

 

क. ड्रेनेज बोर्डपाण्याची गळती प्रभावीपणे हाताळण्यासाठी अंतर्गत भिंतींवर ड्रेनेज बोर्ड लावण्यात येतात. या बोर्डस् मध्ये जलवाहिका असतात ज्या येणारे पाणी भिंतींमध्ये साचणार नाही, याची काळजी घेऊन ते पाणी निचरा यंत्रणेकडे वळवतात. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी ड्रेनेज बोर्डस् इतर अंतर्गत वॉटरप्रूफिंग पद्धतींच्या संयोजनात (त्यांच्यासोबत) चांगले कार्य करतात.

 

ड. सिमेंटयुक्त कोटिंग

सिमेंटचे कोटिंग अंतर्गत भिंतींवर थेट लावले जाते आणि ते पृष्ठभागामध्ये मुरून आणि पाण्याचा प्रवेश रोखून एक वॉटरप्रूफ अडथळा निर्माण करते. ओलाव्यापासून सर्वकष संरक्षण सुधारण्यासाठी ते बर्‍याचदा इतर वॉटरप्रूफिंग पद्धतींच्या संयोजनात वापरले जातात.निष्कर्षअंती, भिंतींचे वॉटरप्रूफिंग हा एक संरक्षणात्मक उपाय आहे जो आपल्या घराचा किंवा इमारतीचा टिकाऊपणा आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. भिंतींत पाणी मुरल्याच्या हानिकारक परिणामांमुळे संरचनात्मक बिघाड, बुरशीची वाढ आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे संपूर्ण संरचनेच्या अखंडतेसोबत तडजोड होऊ शकते. योग्य वॉल वॉटरप्रूफिंग पद्धती किंवा भिंतींसाठी वॉटरप्रूफ रसायनात गुंतवणूक करून, आपण आपल्या मालमत्तेचे पाण्याशी संबंधित नुकसानापासून संरक्षण करू शकता, आरोग्यकारक राहणी वातावरण राखू शकता आणि दीर्घकालीन महागड्या दुरुस्तीवर बचत करू शकता.वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

1. ओलसरपणा ही एक गंभीर समस्या आहे का?

ओलसरपणा ही खरोखरच एक गंभीर समस्या असू शकते, कारण यामुळे बुरशीची वाढ, संरचनात्मक क्षय आणि  खराब घरगुती हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्याच्या जोखमीसह अनेक समस्या उद्भवू शकतात. इलाज न केल्यास, ओलसर भिंती इमारतीच्या संरचनेचे लक्षणीयरित्या नुकसान करू शकतात आणि तिच्या राहण्याच्या योग्यतेशी तडजोड करू शकतात.

 

२. ओलसर भिंतीला वॉटरप्रूफ करता येईल का?

ओलसर भिंतीला वॉटरप्रूफ करण्याची शिफारस सहसा केली जात नाही. कोणतेही वॉटरप्रूफिंग द्रावण लागू करण्यापूर्वी, ओलसरपणाच्या मूळ कारणाकडे लक्ष देणे आवश्यक असते, ज्यात गळती दुरुस्त करणे, निचरा सुधारणे किंवा संघनन समस्या सोडविणे समाविष्ट असू शकते. एकदा भिंत कोरडी झाली आणि मूळ कारणाकडे लक्ष दिले गेले की, भविष्यातील ओलसरपणा टाळण्यासाठी वॉटरप्रूफिंग उपाय लागू केले जाऊ शकतात.

 

३. भिंतींत ओलसरपणा कशामुळे येतो?

छतामधून पाण्याची गळती, सदोष प्लंबिंग, जमिनीतून ओलसरपणा वर येणे, अपुरे व्हेंटिलेशन आणि तापमान आणि आर्द्रतेच्या फरकामुळे संघनन यासह इतर विविध घटकांमुळे भिंतींत/भिंतीवर ओलसरपणा उद्भवू शकतो.

 

4. ओलसरपणाची लक्षणे कोणती?

भिंतींतील ओलसरपणाच्या सामान्य लक्षणांमध्ये पाण्याचे डाग, खपल्या/पोपडे निघालेला रंग किंवा वॉलपेपर, कुबट वास, दृश्य बुरशीची वाढ आणि प्रभावित भागात ओलसरपणा किंवा आर्द्रतेची जाणीव यांचा समावेश होतो.

 

5. खिडक्या उघडल्याने ओलसरपणा कमी होतो का?

खिडक्या उघडल्याने व्हेंटिलेशन सुधारून ओलसरपणा कमी होण्यास मदत होते, यामुळे हवा बाहेर पडते आणि ताजी हवा परीसंचारीत (सर्क्युलेट) होते. बाथरूम आणि स्वयंपाकघर यासारख्या ओलसरपणा प्रवण भागात योग्य व्हेंटिलेशन आवश्यक आहे.


संबंधित लेख
शिफारस केलेले व्हिडिओ

घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....