Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence


बांधकामात ग्राऊटिंग म्हणजे काय आणि वापरल्या जाणार्‍या ग्राऊटिंग मटेरियलचे प्रकार

बोल्ट लावणे असो, भेगा दुरुस्त करणे असो किंवा पाया प्रबलित करणे असो, आधुनिक बांधकाम पद्धतींमध्ये ग्राऊटिंग हे एक आवश्यक तंत्र बनले आहे. याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केले जाऊ शकते, तरीही ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे जी विविध प्रकल्पांची संरचनात्मक अखंडता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Share:


ग्राऊटिंग ही एक महत्त्वपूर्ण बांधकाम प्रक्रिया आहे जी विविध बांधकाम घटकांची संरचनात्मक अखंडता, स्थिरता आणि टिकाऊपणा वाढविण्यात मदत करते. यात एक प्रवाही पदार्थाने पृष्ठभागांमधील अंतर, पोकळी किंवा जागा भरणे, एक घट्ट, टिकाऊ बंध तयार करणे समाविष्ट आहे जे संरचनेची एकंदरीत सामर्थ्य आणि कार्यक्षमता वाढवते. या ब्लॉगमध्ये, आपण बांधकामात ग्राऊटिंग म्हणजे काय हे समजून घेऊ आणि त्याचे महत्त्व, त्याचे अनुप्रयोग आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये सामान्यत: वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या ग्राऊट मटेरियलबद्दल जाणून घेऊ.



बांधकामात ग्राऊटिंग म्हणजे काय?

बांधकामाच्या संदर्भात, ग्राऊटिंग ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे ज्यामध्ये संरचनेतील अंतर, पोकळी किंवा जागेत प्रवाही मटेरियल इंजेक्ट करणे (अंतःक्षेपण करणे) समाविष्ट असते. संरचनात्मक अखंडता सुधारणे, भारवहन क्षमता वाढविणे आणि बांधकाम प्रकल्पाच्या विविध घटकांना स्थैर्य प्रदान करणे हा त्यामागील उद्देश असतो. ह्या पोकळ्या भरून काढून, ग्राऊटिंग पाणी, हवा किंवा कचरा जमा होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे अन्यथा कालांतराने संरचना कमकुवत होऊ शकते.

 

महत्वाची बाब अशी आहे की ग्राऊट हे बांधकाम मटेरियल स्वत: भरून काढू शकत नाही अशा पोकळ्या भरून काढते, मूलत: ते सर्व काही एकत्र बांधून ठेवणारा "गोंद(ग्लू)" म्हणून कार्य करते. हालचाल रोखून, ग्राऊटच्या वापरामुळे कालांतराने बांधकाम स्थिरावण्याचा(सेटलमेंट), स्थलांतरित(शिफ्ट) होण्याचा किंवा अध:पतन होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे केवळ वास्तूचे आयुष्यच वाढत नाही तर रहिवासी आणि आजूबाजूच्या पर्यावरणाच्या सुरक्षिततेतही हातभार लागतो. हे बांधकामात चांगली गुणवत्ता प्राप्त करण्यास मदत करते आणि बांधकाम घटकांचे आयुर्मान वाढवते.


बांधकामात वापरल्या जाणार्‍या ग्राऊटिंग मटेरियलचे प्रकार



बांधकामात अनेक प्रकारचे ग्राऊटिंग मटेरियल वापरले जातात. मटेरियलची निवड विशिष्ट बांधकाम कार्याच्या आवश्यकतेवर अवलंबून असते. येथे, आपण काही महत्त्वपूर्ण प्रकार बघूया.

 

1. सिमेंट ग्राउटिंग



सिमेंट हा सामान्यत: वापरला जाणारा ग्राऊटिंग मटेरियल आहे आणि तो सामान्यत: मातीचे स्थिरीकरण आणि संरचनात्मक सपाटीकरणासाठी वापरला जातो. हा सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे आणि त्यात सिमेंट, पाणी आणि कधीकधी वाळूचे मिश्रण पोकळ्यांमध्ये/गॅपमध्ये इंजेक्ट करणे (अंतःक्षेपण करणे) समाविष्ट असते. हे कालांतराने कठोर होते, आणि एक मजबूत तसेच स्थिर बंध(बॉन्ड) तयार करते. मटेरियल कठोर झाल्यानंतर एक कॉम्पॅक्ट वस्तुमान(मास) तयार करते, ज्यामुळे बांधकामास अतिरिक्त आधार आणि सामर्थ्य प्रदान होते. काँक्रीटच्या रचनेतील पोकळी भरण्यासाठी (ज्याला काँक्रीट ग्राऊटिंग देखील म्हणतात), भेगा/तडा दुरुस्त करण्यासाठी आणि पायाची भारवहन क्षमता सुधारण्यासाठी या प्रकारचे ग्राऊट आदर्श असते.

 

2. केमिकल ग्राउटिंग

यामध्ये पॉलीयुरेथेन किंवा अॅक्रिलेट सारखी विशिष्ट रासायनिक संयुगे पोकळीमध्ये इंजेक्ट केली जातात. ही रसायने संपर्क झाल्यावर विस्तारतात, जेणेकरून पोकळी भरून निघते आणि पाण्याच्या आतझिरपण्याविरुद्ध सीलिंग प्राप्त होते. या प्रकारचे ग्राऊट विशेषतः वॉटरप्रूफिंग, माती स्थिरीकरण आणि भूमिगत वास्तूंच्या दुरुस्तीसाठी  उपयुक्त ठरते.

 

3. स्ट्रक्चरल ग्राउटिंग



हा प्रकार कॉलम आणि बीम सारख्या संरचनात्मक घटकांमध्ये एक ठोस जोडणी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. एपॉक्सी ग्राउट, एक प्रकारचा स्ट्रक्चरल ग्राउट, असामान्य सामर्थ्य आणि टिकाऊपणा प्रदान करतो. हे सामान्यत: बोल्टला अँकर करण्यासाठी, उच्च-ताण असलेल्या भागात काँक्रीट घटकांना बळकट करण्यासाठी आणि विद्यमान संरचनेतील भेगा/तडा किंवा पोकळी भरण्यासाठी वापरले जाते.

 

4. बेंटोनाइट ग्राउटिंग

या प्रकारच्या मटेरियलमध्ये बेंटोनाइट माती आणि पाण्याचे मिश्रण वापरून जेलसारखा पदार्थ तयार केला जातो. पाण्याच्या संपर्कात असतांना त्याचा विस्तार होत असल्याने ते पोकळी प्रभावीपणे सील करते म्हणून विहिरी आणि बोअरवेल सील करण्यासाठी ही एक लोकप्रिय निवड आहे. या प्रकारच्या ग्राऊटचा वापर बर्‍याचदा माती सील करण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी, पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी आणि संभाव्य जमिनीची हालचाल कमी करण्यासाठी केला जातो.

 

5. बिटुमिनस ग्राउटिंग

यात बिटुमिनस कंपाऊंडचा वापर समाविष्ट आहे, जो छत, पाया आणि तळघर संरचना सील आणि वॉटरप्रूफ करण्यास मदत करतो आणि उत्कृष्ट पाणी प्रतिरोध प्रदान करतो. ते अतिनील किरणोत्सर्ग आणि कठोर हवामान परिस्थितीविरूद्ध उत्कृष्ट टिकाऊपणा आणि प्रतिकार प्रदान करते. बोगदे आणि भूमिगत संरचनांसारख्या परिस्थितीत जिथे पाण्याचा प्रवेश/झिरपणे कमी करणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत या प्रकारचे ग्राऊट वापरले जाते.

 

6. रेजिन ग्राउटिंग

या प्रकारच्या मटेरियलमध्ये इपॉक्सी, पॉलीयुरेथेन किंवा इतर द्रव रेजिन्स वापरले जातात जे सजलन प्रक्रिया झाल्यावर मजबूत बंध तयार करण्यासाठी कठोर होतात. हे रेजिन्स उच्च तन्यता आणि संपीडण(कोंप्रेसिव्ह) सामर्थ्य प्रदान करतात, ज्यामुळे ते विविध अनुप्रयोगांसाठी अनुकूल ठरतात. हे त्याच्या उत्कृष्ट आसंजनगुणधर्म आणि सामर्थ्यामुळे बर्‍याचदा काँक्रीटमधील भेगा/तडा दुरुस्त करण्यासाठी वापरले जाते.


बांधकामात ग्राउटिंगचे फायदे

बांधकामात ग्राऊटिंग काय आहे हे समजून घेताना त्याचे अनेक फायदे समजून घेणे देखील महत्वाचे आहे. येथे त्याचे काही प्रमुख फायदे दिले आहेत:

 

1. वाढीव संरचनात्मक स्थिरता

बांधकाम मटेरियलतील पोकळी भरून काढण्याची क्षमता ग्राउटमध्ये असते, ज्यामुळे एकंदरीत संरचनात्मक स्थैर्य वाढते.

 

2. गळती रोखणे

ग्राऊट एक अडथळा म्हणून कार्य करू शकते जे पाणी आणि इतर द्रव्याची गळती रोखते.

 

3. भारवहन क्षमतेत वाढ

सिमेंट ग्राऊटिंग मटेरियल सारख्या ग्राऊट्स हे अधिक सामर्थ्य आणि आधार देऊन वास्तूंची भारवहन क्षमता वाढवते.

 

4. गंज प्रतिरोध

इपॉक्सी ग्राउट सारखे काही मटेरियल गंज प्रतिरोध प्रदान करतात, ज्यामुळे बांधकामाचे आयुष्य वाढते.

 

5. मृदा स्थिरीकरण

माती/मृदा स्थिरीकरणात, विशेषत: पाया किंवा भूमिगत वास्तूंच्या बांधकामात ग्राऊट्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

 

6. पोकळी सील करणे

ग्राऊट प्रभावीपणे पोकळी आणि गॅप सील करू शकते, ज्यामुळे पाण्याच्या आतझिरपणी किंवा मातीची घुसखोरी/अंतःक्रमण रोखली जाते.

 

7. संरचनात्मक दुरुस्ती

रेजिन आणि इपॉक्सी ग्राऊटचा वापर बर्‍याचदा काँक्रीटमधील भेगा/तडा आणि नुकसान दुरुस्त करण्यासाठी केला जातो.



निष्कर्षअंती, बांधकामात ग्राऊटिंग म्हणजे काय हे समजून घेतल्यास, आपल्याला हे लक्षात येते की ते महत्त्वपूर्ण आहे कारण त्यामुळे बांधकामातील संरचनांची स्थिरता, सामर्थ्य आणि टिकाऊपणा वाढतो. बांधकाम व्यावसायिक सतत किफायतशीर आणि टिकाऊ बांधकाम उपाय शोधत असल्याने, योग्य ग्राऊटिंग तंत्र समजून घेणे आणि त्याची अंमलबजावणी केल्यास अधिक यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणारे प्रकल्प निर्माण करता येतात.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

1) पुन्हाग्राऊट करण्यापूर्वी मला जुने ग्राऊट काढून टाकावे लागेल का?

होय, पुन्हाग्राऊट करण्यापूर्वी जुने ग्राऊट काढून टाकण्याची शिफारस केली जाते. योग्य बंध सुनिश्चित करण्यासाठी, जुने ग्राऊट काढून टाकणे आवश्यक आहे कारण त्यात बुरशी किंवा घाण असू शकते. जुने किंवा खराब झालेले ग्राऊट तसेच राहू दिल्यास नवीन ग्राऊट थर अयशस्वी होऊ शकते.

 

२) जास्त वेळ ग्राऊट तसेच ठेवल्यास काय होते?

जर आपण साफसफाई न करता बराच वेळ ग्राऊट तसेच ठेवले तर ते फरशीच्या पृष्ठभागावर कडक होते आणि काढून टाकणे आव्हानात्मक बनते. यामुळे अस्ताव्यस्त देखावा निर्माण होतो आणि त्याच्या स्वच्छतेसाठी अतिरिक्त श्रम लागू शकतात.

 

3) ग्राऊट सेट(कडक) होण्यास किती वेळ लागतो?

बरेच मानक ग्राऊटला परिपक्व होण्यासाठी आणि पूर्णपणे कडक होण्यासाठी सुमारे 24 ते 48 तास लागतात. तथापि, विशिष्टता ग्राऊट प्रकार, निर्मात्याची मार्गदर्शक तत्त्वे आणि आर्द्रतेची पातळी तसेच तापमान यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असते.

 

४) ग्राऊटिंग करण्यापूर्वी फरशा ओल्या कराव्यात का?

सामान्य परिस्थितीत ग्राऊटिंग करण्यापूर्वी फरशा ओल्या करण्याची सामान्यत: आवश्यकता नसते. तथापि, अत्यधिक उष्णता किंवा कमी आर्द्रता असलेल्या वातावरणात, फरश्या ओल्या केल्याने फरशीला ग्राऊटमधून ओलावा लवकर बाहेर काढण्यापासून रोखता येते.

 

5) ग्राऊटिंगसाठी कोणते सिमेंट वापरले जाते?

साधारण, बिगर-आकुंचीत (नॉन-श्रिंक) ग्राऊट, एक उच्च-सामर्थ्य, द्रव सिमेंट ग्राऊट, सामान्यत: ग्राऊटिंगसाठी वापरला जातो, कारण त्यात बिगर-आकुंचन आणि उच्च प्रवाहक्षमतेचे अद्वितीय गुणधर्म असतात.


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....