Share:
Home Building Guide
Our Products
Useful Tools
Product
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
Share:
बोअरवेल म्हणजे भूमिगत जलस्त्रोतांपर्यंत पोहोचण्यासाठी जमिनीत खोदलेला अरुंद कुपक(शाफ्ट). यात सामान्यत: एक वेष्टण(केसिंग) पाईप असतो, जो बोअरवेलला आतमध्ये खचण्यापासून प्रतिबंधित करतो आणि पृष्ठभागावर पाणी खेचणारा एक सबमर्सिबल(पाण्यात बुडवता येणारा) पंप असतो. बोअरवेलची खोली ही ठिकाण आणि इच्छित पाण्याची उत्पादन क्षमता यावर अवलंबून असते.
ज्या भागात पृष्ठभागावरील पाण्याचे स्त्रोत दुर्मिळ किंवा बिनभरवशाचे असू शकतात अशा भागात पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बोअरवेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते भूमिगत जलवाहिन्यांमध्ये प्रवेश करत सहसा १०० ते २००० फूट पर्यंत खोल असतात. व्यापारी, औद्योगिक आणि निवासी संस्थांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. घरगुती वापर, सिंचन आणि विविध उद्योगांसाठी ते पाण्याचा भरवशाचा स्त्रोत म्हणून काम करतात. विशेषत: ज्या भागात पाऊस अपुरा किंवा अनियमित असतो अशा भागात बोअरवेल पाणी टंचाईवर शाश्वत उपाय प्रदान करतात.
बोअरवेलमध्ये अनेक समस्या येऊ शकतात ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि पाण्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. चला काही सामान्य समस्यांबद्दल जाणून घेऊया:
भूमिगत पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण काळानुसार बदलू शकते. दुष्काळ, प्रदूषण किंवा जलप्रस्तरांचा ऱ्हास यासारख्या घटकांचा परिणाम बोअरवेलच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. जलस्त्रोतावर लक्ष ठेवणे आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कधीकधी, बोअरवेल पुरेसे पाणी पुरवू शकत नाहीत. हे कमी उत्पादन देणारे जलप्रस्तराची उपस्थिती, अवरोधीत (चौकअप) पाईप किंवा भूमिगत जलस्त्रोताच्या अपुऱ्या पुनर्भरणामुळे उद्भवू शकते. उत्पादन चाचणी घेतल्यास बोअरवेलचे पाणी उत्पादन माहिती होण्यास आणि कमी पाणी उत्पादनाची संभाव्य कारणे ओळखण्यास मदत होते.
कालांतराने, बोअरवेलचे वेष्टण/आवरण खराब होऊ शकते, ज्यामुळे संरचनात्मक नुकसान होऊ शकते. भेगा पडणे, गळती होणे किंवा गंज लागू शकतो, ज्यामुळे दूषित पदार्थ बोअरवेलमध्ये प्रवेश करतात आणि पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. बोअरवेलच्या आवरणाची नियमित तपासणी आणि देखभाल केल्यास कोणतेही नुकसान लवकर ओळखण्यास आणि पुढील बिघाड टाळण्यास मदत होते.
बोअरवेलमध्ये वापरल्या जाणार्या सबमर्सिबल पंपामध्ये, मोटर निकामी होणे, अडथळे येणे(ब्लॉक होणे) किंवा इंपेलरचे क्षती पोहचणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमुळे पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो किंवा पंप पूर्णपणे निकामी होऊ शकतो. इष्टतम कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी पंपिंग उपकरणांची नियमित देखभाल, जीर्ण झालेले भाग साफ करणे किंवा बदलणे आवश्यक आहे.
बोअरवेलमध्ये उद्भवणार्या सामान्य समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाय योजना राबविता येतील.
पंप निकामी झाल्यास किंवा त्याला क्षती पोहचल्यास, सबमर्सिबल पंप बदलणे किंवा दुरुस्त करणे आवश्यक असते. एक व्यावसायिक तंत्रज्ञ समस्येचे निदान करू शकतो आणि सर्वात योग्य उपाय सुचवू शकतो. बोअरवेल फिल्टर साफ करणे आणि कोणत्याही ब्लॉकेजची तपासणी करणे यासह पंपाची नियमित देखभाल पंप निकामी होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते.
बोरहोलमध्ये कालांतराने गाळ, खनिज साठे किंवा जैविक वाढ जमा होऊ शकते, ज्यामुळे पाण्याचे उत्पादन कमी होते. बोअरहोलच्या पुनर्विकासात पाण्याचा प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी या जमा झालेल्या साठ्यांची साफसफाई आणि बाहेर काढणे समाविष्ट असते. एक व्यावसायिक बोअरवेल सेवा प्रदाता बोअरहोल प्रभावीपणे साफ करण्यासाठी जेटिंग, सर्जिंग किंवा एअरलिफ्टिंग सारख्या तंत्रांचा वापर करू शकतो.
बोअरवेलमधून पुरेसे पाणी मिळत नसेल तर पंपिंग रेट(दर) कमी केल्यास पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होऊ शकते. हे धोरण भूमिगत जलप्रस्तरांना पुरेसे पुनर्भरीत करण्यास मदत करते आणि अधिक शाश्वत उपाय प्रदान करते. आपल्या बोअरवेलसाठी इष्टतम पंपिंग दर निश्चित करण्यासाठी हायड्रोजिओलॉजिस्ट किंवा बोअरवेल तज्ञांचा सल्ला घ्या.
लहान बोअरवेल मशीन, बोअरवेलच्या पाण्याच्या पंपांची नियमित देखभाल आणि ब्लॉकेज टाळण्यासाठी आणि पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी बोअरवेल फिल्टर समाविष्ट करणे अशा या उपायांची अंमलबजावणी करून आपण आपल्या बोअरवेल प्रणालीचे इष्टतम क्रियाशीलता सुनिश्चित करू शकता.
बोअरवेल भरवशाचा आणि सातत्यपूर्ण पाणीपुरवठा प्रदान करतात, परंतु त्यांना बर्याच सामान्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बोअरवेलच्या समस्या आणि उपायांची माहिती घेऊन, आपण आता बोअरवेलला योग्य देखभाल आणि व्यवस्थापन मिळेल याची खात्री करू शकता. क्लिष्ट समस्यांकडे लक्ष देताना व्यावसायिकांचा सल्ला घेणे आणि आपल्या बोअरवेल प्रणालीची इष्टतम कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.