पावसाच्या पाण्याचे प्रभावीपणे जतन

करणाऱ्या यंत्रणेसाठीचे टप्पे

25 ऑगस्ट, 2020

भूजल हा तुमच्या घरासाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. परंतु, या स्त्रोताचा अवाजवी वापर त्याचा कालांतराने -हास करू शकतो. भूजल पुनर्भरण करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचे जतन/वापर करणे आणि हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रिचार्ज पिट स्थापन करणे होय.

तुम्ही अशाप्रकारे रिचार्ज पिट तयार करू शकता.

    एक ते दोन मीटर रुंद व दोन ते तीन मीटर खोल खड्डा खणून सुरुवात करा.

    खड्डा सर्वप्रथम दगडांनी, नंतर खडबडीत खडीने व अखेरीस वाळूने भरा. यामुळे पावसाळी पाण्याचा प्रवाह मिळवला जाईल व खड्ड्यामार्फत शुध्द केला जाईल.

    तुम्ही पिटच्या वरच्या भागाला जाळीने कव्हर करुन त्याला संरक्षित करु शकता. पाणी सहजपणे वाहण्यासाठी तो नियमितपणे स्वच्छ करण्याची खात्री करावी.

    जिथे पावसाचे पाणी गोळा होते, तिथे ते रिचार्ज पिटमध्ये जाण्यासाठी पाईपचा फनेलसारखा उपयोग करावा. तुम्ही घरगुती गरजांसाठी देखील हे पाणी संग्रहित करु शकता.

रिचार्ज पिटमधून पावसाचे पाणी गोळा करण्याच्या या तंत्रामुळे तुम्हाला बहुमोल भूजलसाठ्याचे पुनर्भरण करण्यास मदत होईल.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा