संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj


जमिनीवरील फरश्यांना तडा का जातात ? सामान्य कारणे आणि त्यांना कसे टाळावे

तडा गेलेल्या जमिनीवरील फरश्यांच्या क्लेशकारक दृश्यामागील कारणे समजून घ्या आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी जमीनीवरील फरश्यांना तडा जाऊ नयेत म्हणून प्रभावी पद्धती जाणून घ्या.

Share:


जमिनीवरील फरश्या कोणत्याही जागेचे सौंदर्य आणि सुरेखपणा वाढवू शकतात, परंतु तडा गेलेल्या फरश्या सौंदर्य आकर्षण त्वरीत नष्ट करू शकतात. जर आपण कधीही फरश्यांमधील तडांचा(भेगांचा) सामना केला असेल तर त्यांना दुरुस्त करणे किंवा बदलणे किती वैफल्यग्रस्त आणि खर्चिक असू शकते हे आपल्याला माहित आहे. जमीनीवरील फरश्यांना तडा जाण्यामागील कारण आणि ही समस्या कशी टाळावी हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी, आम्ही हे सर्वसमावेशक मार्गदर्शक तयार केले आहे. चला तडा गेलेल्या फरश्यांची सामान्य कारणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांचा शोध घेऊया.



जमीनीवरील फरश्यांना तडा जाणे म्हणजे काय?


जमीनीवरील फरश्यांना तडा जाणे म्हणजे आपल्या जमीनीवरील फरश्यांमध्ये भेग, फ्रॅक्चर(भंजन) किंवा ब्रेक(खंडीतता)ची उपस्थिती. ह्या तडा केवळ फरश्यांच्या पृष्ठभागावर परिणाम करणार्‍या लहान, लक्षात न येण्याजोग्या फटांपासून फरश्यांमध्ये खोलवर जाणार्‍या मोठ्या, लक्षात येण्याजोग्या भेगांपर्यंत असू शकतात. केवळ सौंदर्यदृष्ट्या अप्रसन्न असण्यापलीकडे, काही प्रकरणांमध्ये, ह्या तडा मूलभूत संरचनात्मक समस्या दर्शवू शकतात ज्या संभाव्यत: आपल्या घराच्या किंवा व्यवसायाच्या बांधकामाच्या अखंडतेस मोठा धोका निर्माण करू शकतात.

 

आपल्या फरश्यांमधील, अगदी केसांइतक्या बारीक तडा देखील केवळ सौंदर्यबाबतच्या समस्येपेक्षा अधिक काही असू शकते. त्या आपल्या जमीनीवरील फरश्यांच्या खाली ओलाव्याला प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करू शकतात, ज्यामुळे बुरशीची वाढ होऊ शकते. शिवाय, कालांतराने, ह्या तडा देखील अधिक खोल होऊ शकतात, ज्यामुळे आपल्या जागेत अडखळून पडण्याचे धोके निर्माण होतात. इपॉक्सी ग्राऊट सारख्या योग्य उपायांनी फरश्यांमध्ये तडा/भेगा भरून त्यांच्या त्वरित दुरुस्तीसाठी आणि प्रतिबंधासाठी या तडांचे कारण समजून घेणे महत्वाचे आहे.


फरश्यांमध्ये तडा कशामुळे जातात?



जमीनीवरील फरश्यांना तडा जाण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. जमीनीवरील फरश्यांना तडा जाण्यापासून प्रभावीपणे रोखण्यासाठी ही कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. हे आहेत सर्वात सामान्य अपराधी :

 

1. कठोर आघात

फरश्यांना तडा जाण्याचे एक प्राथमिक कारण म्हणजे कठोर आघात. जेव्हा जड वस्तू फरश्यांवर पडते किंवा जेव्हा फरश्यांवर तीव्र आघात होतो तेव्हा त्यांना त्वरित तडा जाऊ शकतात किंवा कालांतराने त्या कमकुवत होऊ शकतात. फरश्यांचे नुकसान होऊ नये म्हणून फरश्या बसवलेल्या पृष्ठभागावर फर्निचर किंवा इतर जड वस्तू हलवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

2. चुकीची प्रतिष्ठापणा

खराब प्रतिष्ठापणा पद्धतींमुळे फरश्यांना तडा जाऊ शकतात. अपुरे आसंजक(अधेसिव्ह) व्याप्ती, अयोग्य ग्राऊटिंग किंवा अपुरी अध:स्तर तयारी ह्या सामान्य प्रतिष्ठापणा चुका आहेत ज्यामुळे फरश्यांना तडा जाऊ शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी योग्य प्रतिष्ठापणा तंत्रांचे अनुसरण करणार्‍या एखाद्या व्यावसायिक फरश्या बसवणार्‍याची नेमणूक करणे महत्वाचे आहे.

 

3. जास्त वजन पेलणे

फरश्यांवर जास्त वजन किंवा दबावामुळे त्यांना तडा जाऊ शकतो, विशेषत: अपुऱ्या संरचनात्मक आधार असलेल्या भागात. जेव्हा जड वस्तू थेट फरश्यांवर ठेवल्या जातात किंवा जेव्हा विशिष्ट जागांवर केंद्रित वजन असते तेव्हा हे होऊ शकते. आपल्या फरश्या बसवलेल्या पृष्ठभागावरील वजन वितरणाबद्दल सावध रहा आणि तडा जाणे टाळण्यासाठी योग्य आधार वापरा.

 

4. तडा गेलेला अध:स्तर

अध:स्तर किंवा खाली असलेला पृष्ठभाग फरशांच्या टिकाऊपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जर अध:स्तर खराब झाला असेल, त्याला तडा गेल्या असतील किंवा तो समतल नसेल तर यामुळे वरील फरश्यांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना तडा जाऊ शकतात. फरशी बसविण्यापूर्वी अध:स्तर चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा आणि कोणत्याही संरचनात्मक समस्यांचे त्वरित निराकरण करा.

 

5.कंट्रोल जॉइंट( नियंत्रण जोड)वर फरशी बसविणे

कंट्रोल जॉइंट (नियंत्रण जोड) किंवा एक्स्पांशन जॉइंट(प्रसरण जोड) हे नैसर्गिक हालचाल आणि बांधकाम मटेरियलच्या प्रसारणास अनुमती देण्यासाठी डिझाइन केलेले असता. फरशी बसवताना करताना या जॉइंटकडे दुर्लक्ष केल्यास फ्लोअरिंग(तळाची-स्लॅबची)ची हालचाल मर्यादित होऊ शकते, ज्यामुळे फरशीवर ताण येतो आणि परिणामी फरशीला तडा जातात आणि फरश्या उखडून बाहेर येतात. कंट्रोल जॉइंट कडे लक्ष द्या आणि एक्स्पांशन(प्रसरण) आणि कॉंट्रॅक्शन(आकुंचन) समायोजित करण्यासाठी योग्य फरशी बसवणी पद्धतींचे अनुसरण करा.


तडा गेलेल्या फरश्या कशाप्रकारे टाळाव्यात ?



तडा गेलेल्या फरश्या टाळण्याची वेळ येते तेव्हा प्रतिबंध हा महत्वाचा आहे. काही सक्रिय उपाय योजना करून, आपण जमीनीवरील फरश्यांना तडा जाण्याचा धोका कमी करू शकता आणि तडा गेलेल्या फरश्या दुरुस्त करण्याचा त्रास टाळू शकता. तडा गेलेल्या फरश्या टाळण्यासाठी खालील टिपा अंमलात आणण्याचा विचार करावा:

 

1. पोर्सेलिन फरश्या निवडा

पोर्सिलेन फरश्या अत्यंत टिकाऊ आणि भेगांना/तडांना प्रतिकार करणार्‍या असतात. या प्रकारच्या फरश्यांची निवड केल्यास फरश्यांना तडा जाण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. पोर्सिलेन फरश्या त्यांची मजबूती आणि जड वापराचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे त्या उच्च-रहदारीच्या क्षेत्रांसाठी एक उत्कृष्ट निवड बनतात

 

2. प्लायवूड आणि काँक्रीट सबफ्लोअर(अध:स्तर) वापरा

फरश्यांना तडा जाणे टाळण्यासाठी सबफ्लोअर व्यवस्थित तयार करणे आवश्यक आहे. फरश्यांसाठी स्थिर आणि समतल पृष्ठभाग तयार करण्यासाठी प्लायवूड आणि काँक्रीट अध:स्तर वापरा. हे वजन समानपणे वितरित करण्यास मदत करते आणि अस्थिर पायामुळे तडा जाण्याचा धोका कमी करते.

 

3. डेड स्पॉट (मृत जागा) ची काळजी घ्या

"फरश्या बसविण्यापूर्वी, कोणत्याही पोकळ किंवा असमतल भागासाठी सबफ्लोअरची नीट तपासणी करा. हे ""डेड स्पॉट"" फरश्यांना कमकुवत करू शकतात आणि त्यांना तडा जाण्याची शक्यता वाढवू शकता. फरश्या बसविण्यापूर्वी सबफ्लोअर मजबूत करून किंवा दुरुस्त करून कोणत्याही समस्येचे निराकरण करा."

 

4. एक्स्पांशन(प्रसरण) चा विचार करा

मोठ्या भागात किंवा जागा ज्या तापमानातील चढ-उतार अनुभवतात, तेथे एक्स्पांशन जॉइंट देऊ करणे महत्वाचे आहे. हे जॉइंट फरशांच्या नैसर्गिक हालचालींना सामावून घेतात, आणि तणाव-प्रेरित तडा टाळतात. एक्स्पांशन जॉइंटमधील योग्य अंतर आणि त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी व्यावसायिक इन्स्टॉलरचा सल्ला घ्या किंवा औद्योगिक मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.



तडा गेलेल्या किंवा तुकडे झालेल्या फरश्यांना हाताळणे त्रासदायक ठरू शकते, परंतु त्यामागील कारणे समजून घेऊन आणि प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केल्यास आपला वेळ, पैसा वाचू शकतो आणि वैफल्यापासून बचाव होऊ शकतो . या ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, आपण तडा-मुक्त आणि दीर्घकाळ टिकणार्‍या फरशा लावलेल्या पृष्ठभागांचा आनंद घेण्याच्या मार्गावर असाल. अधिक सखोल फरश्या बसवणी टिपा आणि तंत्रांसाठी, फरश्या बसवणी टिपावरील आमचा व्हिडिओ पहा जो योग्य फरश्या बसवणी पद्धतींमध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....