तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
दिवाणखाने ही तुमच्या घरातील सर्वाधिक वापर केली जात असलेली जागा असते, मग ते रात्री तुमच्या मुलांबरोबर खेळ खेळण्यासाठी असो, तुमच्या जोडीदारासोबत सोफ्यावर बसून कपभर कॉफी पिण्यासाठी असो किंवा प्रत्येक पंधरवड्यात तुमच्या प्रिय मित्र-मैत्रिणींना गेट-टुगेदरसाठी आमंत्रित करणे असो. दोषमुक्त अंतर्गत सजावटीसह, ही जागा नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी वास्तूविषयक काही उपयुक्त सूचना पाळणे महत्त्वाचे असते.
या लेखात दिलेल्या दिवाणखान्यासाठीच्या वास्तूविषयक सूचना तुम्हाला तुमच्या वास्तू-अनुपूरक जागेचे नियोजन करून तिची रचना करण्यासाठी मार्गदर्शन करतील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन आनंदी, यशस्वी आणि आरोग्यदायी होईल.
दिवाणखाना ही अशी खोली असते ज्यातून आपल्या घरी भेट देणारी माणसे तुमच्या वास्तूत प्रवेश करतात, म्हणून प्रवेशद्वार अनुकूल दिशेस असणे महत्त्वाचे असते, जसे पूर्व, उत्तर किंवा ईशान्य; शिवाय ही जागा उत्तम प्रकाशयुक्त असली पाहिजे. ही जागा हॉल-गॅदरिंगची समजली जाते, म्हणून तुम्हाला जर गेट-टुगेदरच्या माध्यमातून वारंवार पाहूणचार करायची हौस असेल, तर वास्तुशास्त्रानुसार त्याची दिशा तुमच्या घराची नैर्ऋत्य दिशा असली पाहिजे.
दिवाणखाना हा तुमच्या घरात प्रवेश करण्याचा भाग असतो आणि तो पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड असलेल्या घरांसाठी ही जागा वायव्य दिशेला असली पाहिजे. दक्षिण दिशेला तोंड असलेल्या वास्तुशास्त्रानुसार दिवाणखाना घराच्या आग्नेय दिशेलाच असला पाहिजे. सांगितलेल्या दिशेला दिवाणखाना असल्यास तुमच्या घरात भरपूर आरोग्य, संपती आणि यश येते. म्हणून तुम्हाला जर भरपूर संपत्तीचे स्वागत करायचे असेल, तर दिवाणखान्यासाठी वास्तुविषयक ह्या उपयुक्त सूचनांचे पालन करा.
दिवाणखान्यात पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे उतार करणे हे वास्तू तज्ज्ञांद्वारे पवित्र समजले जाते. दिवाणखान्याच्या जमिनीला उतार देण्यासाठी ईशान्येची पूर्व दिशा अनुकूल समजली जाते.
दिवाणखान्यातील जमिनीला उतार देणे घरातील मुलांच्या फायद्यासाठीही लाभदायक असते, ज्यामुळे त्यांना अभ्यास करताना यश प्राप्त होते आणि लक्ष केंद्रित करता येते. अभ्यासासाठी पश्चिम दिशेकडील प्रवेश लाभदायक दर्शविण्यात आलेला आहे.
तुमच्या जागेतील इतर कोणत्याही वस्तूप्रमाणेच तुमच्या घरातील टीव्हीच्या योग्य जागेमुळे तुमच्या घरातील लहरींवर परिणाम होत असतो. वास्तूनुसार दिवाणखान्यातील टीव्हीची जागा तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला असली पाहिजे. टीव्ही जर तुमच्या वास्तूच्या वायव्य दिशेस लावला, तर मनोरंजनाची ही जागा तुमच्या घरातील सदस्यांचा बहुमूल्य वेळ टीव्ही बघण्यात वाया घालवू शकते.
दिवाणखान्यासाठी वास्तूनुसार अंतर्गत सजावटीचा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य, संपत्ती आणि आनंद यांवर मोठा परिणाम होत असतो. आरामशीर सोफा सेटसारखे फर्निचर दिवाणखान्यात ठेवल्यामुळे तुमचा दिवाणखाना सुरेख दिसतोच, पण सोफा सेटसाठी ह्या वस्तूंची वास्तूच्या दृष्टीने मांडणी करणेही महत्त्वाचे असते. सोफा सेट पूर्वेच्या किंवा उत्तरेच्या भिंतींना लावून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण तेथे पूर्वेकडून येणारी सूर्यकिरणे थेट प्रतिबिंबित होत असतात.
मनोहारी पेंटिग्ज आणि पोट्रेट्समुळे तुमच्या दिवाणखान्याच्या सौंदर्यात भर पडत असते आणि ती या जागेत ईशान्य दिशेस लावली पाहिजेत. ह्या कलाकृतींमधून सकारात्मकता, आनंद आणि शांतता यांच्या भावना दिसून आल्या पाहिजेत. ज्यातून गडद, दु:खद किंवा नकारात्मक भावना दिसून येतील अशी पेंटिंग्ज किंवा पोट्रेट्स टाळा.
झुंबरासारख्या शोपिसेसना लटकावण्यासाठी वास्तूमध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार ते दिवाणखान्याच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लटकावले पाहिजेत. यांचा या जागेच्या सकारात्मकतेवर आणि सुरेखपणावर उत्तम परिणाम होत असतो.
दिवाणखान्याचा रंग तुमच्या घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा पकडून ठेवू शकतो. दिवाणखान्यासाठी वास्तू अंतर्गत सजावटीनुसार त्याला पांढरा, बीज, क्रीम, पिवळ्या किंवा निळ्या रंगाने रंगवले पाहिजे. ह्या रंगांमुळे सकारात्मकता, आनंद आणि समाधान यांमध्ये भर पडू शकते.
सजावटीच्या काही वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. अशा गोष्टी तुमच्या दिवाणखान्यातून काढून टाकणे चांगले असते. वास्तू अनुपूरक घर असण्यासाठी तुम्ही या गोष्टी टाकून दिल्याच पाहिजेत :
1. हानी पोहोचलेली किंवा नादुरुस्त झालेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि उपकरणे.
2. ज्यातून नकारात्मकता प्रदर्शित होईल अशी पेंटिंग्ज आणि पोट्रेट्स, जसे युद्ध, रडणारे मूल किंवा बुडणारे जहाज.
3. मोडलेल्या किंवा तडकलेल्या चौकटी, आरसे आणि शोपिसेस.
वास्तू असे सुचवते की, फोन दिवाणखान्याच्या विशेषत: पूर्व, उत्तर किंवा आग्नेय दिशेस ठेवला पाहिजे. तुमच्या दिवाणखान्याच्या नैर्ऋत्य किंवा वायव्य दिशेस फोन ठेवू नका.
देवदेवतांचे फोटो टांगण्यासाठीची दिवाणखान्यातील जागा वास्तूनुसार या भागाच्या प्रार्थनेच्या ईशान्य दिशेस असावी असे सुचविले जाते. ती दिशा पवित्र आणि भरभराट घेऊन येणारी मानली जाते.
दिवाणखान्याच्या वास्तूविषयक सूचनांमध्ये असे सुचवलेले आहे की, जास्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून जिन्यासाठी दिवाणखान्यातील सर्वोत्तम जागा म्हणजे पश्चिम, दक्षिण किंवा नैर्ऋत्येचा कोपरा.
तुमच्या जागेत तुमच्या दिवाणखान्याच्या ईशान्य कोपऱ्यात रोपे लावून त्याला सजवा. यामुळे दिवाणखान्यात सकारात्मक लहरी येत असतात.
तुमच्या दिवाणखान्याच्या तापमानात समतोल राखण्यासाठी वास्तू असे सुचविते की, एअर कंडिशनर्स तुमच्या दिवाणखान्याच्या वायव्य, पूर्व किंवा पश्चिम दिशेस लावावेत.
वास्तू अनुपूरक जागेत राहून आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समाधान यांचे स्वागत करा. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे नियोजन करण्यासाठी आणि तुमच्या पाहुण्यांचे सकारात्मक वातावरणात स्वागत करण्यासाठी, मुलांसाठी आणि पाहुण्यांच्या खोल्यांसाठी वास्तुशास्त्रावरील (Vastu Shastra for Children and Guest Rooms) हा लेख वाचा.