संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा

तुमच्या शयनकक्षासाठी (बेडरूमसाठी) वास्तूविषयक अत्यावश्यक सूचना

घरातील बेडरूम हा व्यक्तीची घरातील सुरक्षित जागा असते, अशी जागा जेथे ते त्यांच्या मोकळ्या वेळेत आराम करतात आणि आनंद घेतात. विश्रांती घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी असलेली जागा ही एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत वैयक्तिक आणि खास असते आणि सकारात्मक आणि शांततापूर्ण वातावरण असावे म्हणून तेथे योग्य ऊर्जेचा उत्सर्ग झाला पाहिजे.

येथेच वास्तुशास्त्राची भूमिका महत्त्वाची ठरते. शयनकक्ष ही एक सुरक्षित जागा असावी आणि तेथे सकारात्मक ऊर्जा असावी, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला शांततेचा अनुभव येईल, म्हणून त्यासाठी योग्य वास्तुशास्त्र अत्यंत महत्त्वाचे असते.


तुमच्या बेडरूमचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार करण्याचे महत्त्व

लोक त्यांच्या घराची रचना अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात की त्यांना घरात असल्यासारखे वाटावे आणि योग्य वास्तू असलेला बेडरूम हे निश्चित करतो की, त्यांना शेवटी विश्रांती घेण्याची संधी मिळेल तेव्हा मोठ्या आणि थकवणाऱ्या दिवसाच्या शेवटी त्यांना कसे वाटेल. फक्त एवढेच नाही, तर आपल्या बेडरूममध्ये आपल्याला अत्यंत आवश्यक असलेली जगापासून वेगळी असलेली स्पेस मिळते, जेथे आपण काम करणे, लिहिणे, आपले छंद जोपासणे, इत्यादी कामे करू शकतो. बेडरूमसाठी योग्य वास्तुशास्त्र हा एक असा घटक असतो, जो निश्चित करतो की, या रूममध्ये कोणती ऊर्जा असेल व त्याशिवाय आपले आरोग्य, संपत्ती आणि यश कसे असेल.
 

वास्तूनुसार मास्टर बेडरूम

दिशा : मास्टर बेडरूमसाठीच्या वास्तूविषयक उपयुक्त सूचनांनुसार अशी शिफारस केली जाते की, बेडरूम नैर्ऋत्य दिशेस असावा.

मुख्य दरवाजाची स्थिती : मास्टर बेडरूमच्या वास्तूविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार असे सुचविले जाते की, बेडरूमचा दरवाजा ९० अंशांमध्ये उघडला पाहिजे, त्याने उघडताना किंवा बंद करताना कोणताही करकर आवाज करू नये आणि तो एकतर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावा.

पलंग (बेड) कुठे ठेवावा : मास्टर बेडरूमच्या वास्तूविषयक सूचनांनुसार तुमचा बेड एकतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेस असावा, ज्यामुळे तुमचे पाय उत्तर किंवा पूर्व दिशेस असतील. तो रूमच्या कोपऱ्यात असण्याऐवजी मध्यभागी असावा.

रंग : वास्तूविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार मास्टर बेडरूमसाठी आदर्श रंग म्हणजे करडा, हिरवा, गुलाबी आणि निळा, हस्तिदंती किंवा फिकट रंग.

वॉर्डरोब (कपाट) ची जागा : वॉर्डरोब (कपाट) एकतर पश्चिमेला, नैर्ऋत्येला किंवा दक्षिण दिशेला असावा, कारण मास्टर बेडरूम वास्तूविषयक सूचनांनुसार ह्या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा येत असते.

सजावट : मास्टर बेडरूमच्या वास्तूविषयक सूचनांनुसार अशी शिफारस केली जाते की, भिंतीला निसर्गचित्रांच्या किंवा समुद्राच्या चित्रांच्या शांत पेंटिंग्ज लावाव्यात आणि ज्यातून हिंसाचार दिसून येईल अशा पेंटिंग्ज टाळल्या पाहिजेत.

बेडरूमसाठी वास्तूविषयक सोप्या उपयुक्त सूचना

बेडरूमची दिशा :

Bedroom Direction

बेडरूमची दिशा :
 

 • वास्तूनुसार बेडरूमसाठी आदर्श दिशा म्हणजे उत्तर दिशा, कारण त्या दिशेने करिअरशी संबंधित यश येते असे म्हटले जाते.
 • पश्चिम दिशासुद्धा बेडरूमसाठी चांगली दिशा असते, कारण वास्तूविषयक उपयुक्त सूचनांनुसार त्या दिशेतून संपत्ती येत असते.
 • घराच्या मध्यभागी, ईशान्येला आणि आग्नेयेला बेडरूम असू नये.

पलंगाची (बेडची) दिशा, आकार आणि ठेवण्याची जागा :

bed-direction-shape-position-as-per-vastu

पलंगाची (बेडची) दिशा, आकार आणि ठेवण्याची जागा :
 

 • वास्तूनुसार बेडसाठी आदर्श दिशा म्हणजे खोलीची नैर्ऋत्य दिशा.
 • पलंग लाकडाचा बनवलेला असावा आणि तो एकतर चौरस किंवा आयताकृती असावा.
 • पलंग थेट बीमखाली ठेवू नये.
 • पलंग खोलीच्या मध्यभागी ठेवावा आणि तो वास्तूमध्ये शिफारस केल्यानुसार भिंतींच्या खूप जवळ नसावा.

वास्तूनुसार झोपण्याची दिशा :

sleeping-direction-as-per-vastu

वास्तूनुसार झोपण्याची दिशा :

अशी शिफारस केली जाते की, जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमचे डोके दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे असले पाहिजे आणि तुमचे पाय उत्तरेकडे किंवा पश्चिम दिशेकडे असले पाहिजेत. अशा प्रकारेच तुमचे शरीर सकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. तुमचे डोके उत्तर दिशेकडे करून कधीही झोपू नका.

आरसे, वॉर्डरोब (कपाट) आणि ड्रेसर्सच्या जागा :

placement-of-mirrors-wardrobes-dressers

आरसे, वॉर्डरोब (कपाट) आणि ड्रेसर्सच्या जागा :
 

 • तुमचा वॉर्डरोब (कपाट) बेडरूमच्या नैर्ऋत्य दिशेस असला पाहिजे, ज्यामुळे दरवाजा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडेल.
 • आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे लावला पाहिजे. त्याचे तोंड बेडकडे कधीही असू नये, कारण तुमच्या झोपण्याच्या स्थितीचे प्रतिबिंब पडणे पवित्र समजले जात नाही.
 • मौल्यवान वस्तू उत्तर दिशेस ठेवल्या पाहिजेत, कारण त्याच दिशेला धनाची देवता वास करते.
 • तुमच्या खोलीत कोणताही पसारा नसावा, कारण पसारा असलेल्या खोलीत ऊर्जेच्या प्रवाहाला अडथळा होतो.
 • ड्रेसर हा बेडला लागून ठेवला पाहिजे.

बेडरूमचे छत :

bedroom-ceiling

बेडरूमचे छत :
 

 • असमान किंवा उतार दिलेले छत तयार करणे टाळा, कारण त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि अनिद्रा येतात.
 • अशी शिफारस केली जाते की, छताची उंची १०-१२ फूट असावी, कारण त्यामुले सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहास पुरेशी जागा मिळते.
 • छताला फिकट रंग लावावा, कारण गडद रंगाच्या छतामुळे दुर्दैव आणि अडथळे यांना निमंत्रण दिले जाते.
 • छताला झुंबर किंवा नक्षीकाम यांनी सजवू नये, कारण छत घराच्या मध्यमागाकडे तीन रेषा आयताकृती किंवा चौरस रचनेसह सपाट असावे.

बेडरूममधील बाल्कनी :

balcony-in-the-bedroom

बेडरूममधील बाल्कनी :
 

 • बाल्कनी आदर्शपणे दक्षिणेकडे, ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे असावी.
 • बाल्कनीच्या भिंतींमध्ये ९० अंशांचा कोन असला पाहिजे.
 • बाल्कनीचा ईशान्य भागात बसण्याची व्यवस्था व फुलांची सजावट किंवा लाटांची चित्रे असावीत, कारण त्यामुळे सौर ऊर्जेचा प्रवाह सहजपणे येतो व त्यामुळे तिला जोडलेली खोली प्रकाशमय होते.

बेडरूमचा रंग :

colour-of-the-bedroom

बेडरूमचा रंग :
 

 • तुमच्या बेडरूमच्या रंगांमध्ये कोमल आणि हलक्या रंगछटा असल्या पाहिजे.
 • बेडरूमसाठी आदर्श रंग म्हणजे ऑफ-व्हाईट, क्रीम, करडा, गुलाबी आणि निळा हे आहेत.
 • खोलीत हलका आणि चैतन्यपूर्ण रंग असल्यास एक जिवंत आणि तणावमुक्त वातावरण तयार होते आणि त्यामुळे मन:स्थितीही सुधारू शकते.
 • तुमच्या खोलीत गडद रंगांचा वापर करणे तुम्ही टाळले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि कंपने येतात असे समजले जाते.

आता तुम्हाला तुमच्या बेडरूमसाठी योग्य वास्तू कोणती ते चांगल्या प्रकारे समजलेले आहे, तुमची ही पवित्र जागा सकारात्मक आणि प्रसन्न लहरींनी भरा आणि तिचे नंदनवन बनवा.

बेडरूमव्यतिरिक्त, तुमचा वॉशरूमही अशी जागा असते जेथे तुम्ही बराचसा वेळ घालवीत असता आणि तुम्ही बरेचसे विचार याच जागी करता. त्याचे बांधकाम योग्य वास्तूसह करून ती जागा प्रसन्न राहील ह्याची काळजी घ्या. वॉशरूमसाठी वास्तूबद्दल (Vastu for washrooms.) अधिक वाचा.