अल्ट्राटेकमध्ये आम्हाला आव्हाने घ्यायला, मेहनत करायला, हाय फाइव्ह आणि साजरीकरण करायला आवडतं. आम्ही जोखीम घेतो, जलद गतीने शिकतो आणि आमच्या क्षेत्रात निपुण आहोत. एकत्रितपणे आम्ही सिमेंट उद्योगाला पुन:परिभाषित करतो
तुम्ही विचारताय की आमच्यासोबत का काम करायचं?
तर, ते तुम्ही स्वतः बघा...
मौजमजा आणि काम हातात घलून देणारे संतुलित वातावरण आमच्या कर्मचा-यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना देखील उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रीय महिला दिन आणि बालदिनाच्या साजरीकरणामध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना संवाद साधण्याची आणि तणाव मुक्त होण्याची संधी मिळते.
आमची आरोग्य आणि कल्याण दिनदर्शिका कर्मचाऱ्यांना योग्य आहार, सुरक्षित आणि बरे वाटण्यास मदत करणारे तयार मार्गदर्शन देते. वॉकथॉन, वार्षिक आरोग्य तपासणी, सुरक्षा सप्ताह संस्थेची कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा आणि कल्याणाबद्दल असलेली वचनबध्दता दाखवणारे उपक्रम आहेत.
अल्ट्राटेकमध्ये आमचा जीवन जगण्यावर विश्वास आहे. आम्ही कार्यस्थळावर केवळ आमच्या कर्मचा-यांसाठी नव्हे तर त्यांच्या कुटुंबांसाठी देखील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही आमच्या कर्मचारी वर्गातल्या वैविध्याचा आदर करतो
जागतिक स्तरावर कार्यरत असल्यामुळे अल्ट्राटेक सांस्कृतिक विविधतेची आव्हाने आणि लाभ समजणारी संवेदनशील नियुक्तीकर्ता संस्था बनवण्याच्या महत्वाला ओळखते.
अल्ट्राटेक सिमेंटमधील विविधता म्हणजे विविध विभागात, वयोगटात, संस्कृती आणि लिंगांमध्ये संतुलित कर्मचारीवर्ग असणे होय, ज्यामध्ये सुयोग्य प्रतिभा, कौशल्ये आणि दृजनशीलता असते.
अल्ट्राटेकमध्ये आमचा सर्व अर्जदारांचा पूर्ण आणि न्याय्य विचार करण्यावर तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या निरंतर विकासावर व त्यांना संधी देण्यावर आमचा विश्वास आहे.
स्त्रियांसाठी मैत्रीपूर्ण कार्ये आणि कामाच्या वातावरणाचा आम्हाला अभिमान आहे.
वर्ल्ड ऑफ वुमेन एक ऑनलाइन समुदाय आहे जिथे स्त्रिया एकमेकींकडून शिकू शकतात, ्प्रगती करु शकतात आणि एकमेकींना - वैयक्तिकपणे आणि व्यावसायिक तत्वावर अशा दोन्ही प्रकारे आधार देऊ शकतात.
'ऍक्सलरेटेड वुमेन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (वेगवान महिला विकास कार्यक्रम)'चा उद्देस उच्च संभाव्य स्त्री व्यवस्थापकांना अग्रणी नेतृत्व म्हणून म्हणून विकसित करणे,
ओन नर्चर अपग्रेड युअरसेल्फ कार्यक्रम कनिष्ठ व्यवस्थापन भूमिका साकारत असलेल्या स्त्रियांसाठी असून मधल्या व्यवस्थापन पदांसाठी प्रतिभांची सबळ पाइपलाइन तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा