तुम्ही तुमच्या जीवनातील बचतीचा महत्वाचा भाग तुमच्या घराच्या निर्मितीमध्ये खर्च करता. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी या काही टिप्स आहेत.
घराचे डिझाइन तयार करताना तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील गरजा लक्षात घ्या उदा. तुमचा लहान मुलगा मोठा झाल्यावर त्याच्यासाठी अतिरिक्त खोली लागू शकते. याची खबरदारी घ्या की एकदा तुमचे घर तयार झाले की त्यामध्ये केलेली कोणतीही जोडणी खूप महाग पडेल.
लक्षात ठेवा, आडवे बांधण्यापेक्षा उभे घर बांधणे जास्त किफायतशीर होते म्हणजेच बैठ्या तीन खोल्या बांधण्याऐवजी तुमच्या घराला आणखीन एक मजला बांधणे जास्त स्वस्त पडते.
आवश्यकतेनुसार सामुग्री घ्यावी, मोठ्याप्रमाणावर घेऊ नये, यामुळे वाया जाणे टळते.
तुमच्या बांधकामाचे साहित्य स्थानिक ठिकाणावरुन घ्यावे. यामुळे तुम्हाला केवळ पुरवठ्यावरच योग्य नियंत्रण मिळणार नाही तर तुमच्या वाहतुकीचा खर्च देखील वाचेल.
बांधकाम साहित्याचा स्थळावर दररोज स्टॉक घ्या, ज्यामुळे सामुग्रीच्या वापराचा आणि खर्चाचा अधिक चांगला मागोवा ठेवता येईल.
या तुमच्या घराच्या बांधकामाच्या दरम्यान क्युअरींगच्या काही टिप्स होत्या ज्यामुळे तुमच्या घरातल्या भेगा टाळता येतात. अशा आखणीन टिप्ससाठी येथे भेट द्या: www.ultratechcement.com
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा