25 ऑगस्ट, 2020
पुढच्या पिढ्या आनंदाने नांदण्यासाठी तुमचे घर वर्षानुवर्षे मजबूत राहणे महत्वाचे असते. हे शक्य होण्यासाठी सबळ पायाची आवश्यकता असते आणि पाया भक्कम करण्यासाठी आरसीसी फुटिंग्ज हा सर्वोत्तम मार्ग आहे.
आरसीसी फुटिंग्ज म्हणजे काय?
रेइनफोर्स सिमेंट काँक्रीट (आरसीसी) फुटिंग्ज स्टील बारपासून बनलेली असतात, जे काँक्रीट फाऊंडेशनसाठी रेइनफोर्समेंटचे काम करतात, हे घराचा संपूर्ण भार धारण करतात. फुटिंग्ज तुमच्या घराच्या रचनेवरचा भार कमी करण्यासाठी एकूण वजनाचे जमिनीवर स्थानांतरण करतात. संरचनेच्या गरजांनुसार, फुटिंग एकतर ट्रॅपेझोइडल, ब्लॉक किंवा स्टेप-आकाराच्या असू शकतात.
आरसीसी फुटिंग्ज बसविण्याचे कोणते टप्पे आहेत?
फुटिंग्ज बसवण्यापूर्वी त्यासाठी उत्खनन केलेल्या जमिनीला रॅम करतात. त्यामुळे मातीची दृढता आणि स्थैर्य वाढते.
त्यानंतर क्षेत्रावर 150 मिमी काँक्रीटचा थर दिला जातो आणि बेड तयार केला जातो. यामुळे फुटिंगसाठी तुम्हाला नितळ पृष्ठभाग मिळतो.
रेइनफोर्समेंट केज बसवताना, त्याची आलाइनमेंट नीट असण्याची खात्री करा.
सिमेंटच्या बेडवर स्लरीचा थर दिल्यावर काँक्रीट ओततात. पायाच्या आकारानुसार काँक्रीटची मात्रा असल्याची खात्री करा आणि शटरिंग करण्यास विसरू नका.
अखेरीस, फुटिंग सेट झाल्यावर क्युअरींग करणे विसरू नका. सर्वसमावेशक दृढता निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे.
तुमच्या घरासाठी आरसीसी फुटिंग यथायोग्यपणे स्थापित केल्याची खात्री करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा