कॉंक्रीटच्या कंप्रेसिव्ह दृढतेची कशी चाचणी घ्यावी?

सशक्त घर बांधण्यासाठी योग्य कॉंक्रीट मिक्स अतिशय महत्वाचे असते. म्हणूनच, वापरण्याआधी कॉंक्रीट मिक्स तपासणे आवश्यक आहे. म्हणून, कॉंक्रीट चाचणी करणे आवश्यक आहे. कॉंक्रीट चाचणी 2 प्रकारे केली जाते- कास्टिंगच्या आधी आणि सेटिंग झाल्यावर. चला आपण कॉंक्रीटच्या कंप्रेसिव्ह दृढतेला कशाप्रकारे तपासले जाते ते समजून घेऊया.

 
 
1
ही चाचणी कॉंक्रिट सेट आणि दृढ झाल्यानंतर केली जाते.
2
या चाचणीमध्ये, कॉंक्रिटच्या क्यूब्सची कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनमध्ये चाचणी केली जाते.
3
150मिमी x 150मिमी x 150मिमी आकारमानाचा काँक्रीट क्यूब मोल्ड वापरला जातो.
4
त्याला कॉंक्रिटच्या 3 थरांनी भरले जाते आणि टॅम्पिंग रॉडच्या मदतीने कॉम्पॅक्ट केले आहे.
5
वरच्या पृष्ठभागाला ट्रॉवेलने समतल केले जाते, आणि साचा नंतर ओल्या तागाच्या गोणीने झाकला जातो आणि 24 तास सेट करण्यासाठी सोडला जातो.
6
24 तासांनंतर, ठोकळा साच्यातून काढला जातो आणि 28 दिवस पाण्यात क्युअर केला जातो.
7
ठोकळ्याचा आकार आणि वजन मोजल्यानंतर त्याची चाचणी केली जाते.
8
चाचणी मशीनच्या प्लेट्स आणि काँक्रीट पृष्ठभाग साफ केले जातात आणि प्लेट्सच्या दरम्यान ठोकळा ठेवला जातो.
9
त्यानंतर, ठोकळा फुटेपर्यंत कोणताही धक्का न लागू देता भार हळूहळू वाढवला जातो.
10
कॉंक्रिटची कंप्रेसिव्ह शक्ती कमाल लोडची नोंद करून मोजली जाते.
 



अशाप्रकारे काँक्रीटची कंप्रेसिव्ह चाचणी होते.









दर्जेदार बांधकाम साहित्य आणि तज्ञ समाधाने मिळवण्यासाठी, तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअरशी संपर्क साधा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा