Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

One home. One chance Build it with India’s no.1 cement

logo


पोर्टलॅंड पोझ्झोलाना सिमेंट म्हणजे काय?

 पोर्टलॅंड पोझ्झोलाना सिमेंट (पीपीसी) उच्च दर्जाच्या क्लिंकरला संतुलित रासायनिक संयोजन, उच्च प्रमाणात रिऍक्टिव्ह सिलिका असलेली फ्लाय ऍश तसेच उच्च शुध्दता असलेल्या जिप्समसह इंटर ग्राइंड करुन, कोणतीही घातक सामुग्री न वापरता निर्माण केले जाते.  हे उच्च दर्जाच्या सर्वसामान्य पोर्टलॅंड सिमेंटला अतिशय उच्च प्रमाणात रिऍक्टिव्ह सिलिका असलेल्या अतिसुक्ष्म फ्लाय ऍशसोबत मिसळून देखील तयार केले जाते. या सामुग्रीचे अशाप्रकारे न्याय्य प्रमाण घेतले जाते, ज्यामुळे सुधारीत दर्जाचे मानक असणारे सिमेंट तयार होते. 

 

 अल्ट्राटेक पोर्टलॅंड पोझ्झोलाना सिमेंट अधिक चांगली कार्यक्षमता, कोलॅसिव्ह मिक्सेस, कमी गळती, कमी प्रमाणात भेगा, कमी प्रमाणात पारगम्यता, रासायनिक आक्रमणाला उच्च प्रमाणाअ प्रतिरोध आणि स्टीलचे क्षरण होण्यापासून संरक्षण देण्यासोबत आपल्याला सर्वोत्तम फिनिश देखील देते. हे उच्च प्रमाणात दृढता देखील देते. हे सिमेंट सर्वसामान्य बांधकामात सगळ्या ऍप्लिकेशन्ससाठी (आरसीसी, पीसीसी, गवंडीकाम आणि प्लास्टरींग)साजेसे आहे.

logo


पीपीसी सिमेंटचे लाभ

 अल्ट्राटेकचे पोर्टलॅंड पोझ्झोलाना सिमेंट त्याच्या कार्यक्षमतेसाठी प्रसिध्द आहे. स्फेरिकल सिमेंट कणांमध्ये सर्वोच्च फाइननेस मूल्य आढळते, ते अधिक मुक्तपणे फिरतात आणि छिद्रे अधिक चांगल्याप्रकारे भरण्याची मुभा देतात. यामुळे खासकरुन ऊष्ण तापमान स्थितींमध्ये सिमेंटच्या स्लंप हानीचा दर कमी होतो. पीपीसी सिमेंट आपल्या कमी जल सामुग्रीमुळे गळती थांबवून पाण्याचे गळती होणारे मार्ग बंद करते. 

पीपीसी अतिशय सुक्ष्म स्वरुपाचे असल्यामुळे त्याचा पेस्ट वॉल्युम वाढवते, ज्यामुळे कॉंक्रीटचा स्टीलसोबत सुधारीत बंध निर्माण होण्यात परिणाम होतो. सिमेंट सुरुवातीच्या हायड्रेशनाध्ये चुनखडक/लाइमला मुक्त करते, ज्यामुळे पोकळ्या कमी होतात आणि परिणामत: कॉंक्रीटची पारगम्यता कमी होते, ज्यामुळे टिकाऊपणा मिळतो. यामुळे संरचनेमध्ये सुक्ष्म भेगांच्या विकासाला आळा बसतो, यामुळे संरचनेची मजबूती वाढते.



पीपीसी सिमेंट ग्रेड्स

 सिमेंटची ग्रेड त्याची दृढता दर्शवते. विस्तृत स्वरुपाची दृढता दृढतेच्या मापनामध्ये सर्वात सर्रासपणे आढळणारा प्रकार आहे. खरेदी करण्याआधी ग्रेडची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्याचा संरचनेच्या दृढतेवर लक्षणीय परिणाम होतो. पीपीसी सिमेंटमध्ये कोणत्याही ग्रेड्स नाहीत. दुस-या बाजूला ओपीसी सिमेंटमध्ये 33,43 आणि 53 सारख्या ग्रेडच्या समतुल्य समजले जाते. परंतु पीपीसी सिमेंटच्या मजबूतीला ओपीसी 33 ग्रेड सिमेंटच्या समतुल्य समजले जाते. त्याची ग्रेड मजबूती 330 kg प्रति sq cm आहे.

logo

पीपीसी सिमेंट लागू करण्याचे विभाग

अतिशय उच्च प्रमाणात टिकाऊपणा आणि सल्फेट, पाणी तसेच रासायन आक्रमणांना प्रतिरोध असल्यामुळे याचा वापर समुद्र किना-यालगतच्या  इमारतीच्या, समुद्री संरचनांच्या, पाण्यातील ब्रीच पियर्सम ऍबटंमेंट्स आणि आक्रमक स्वरुपाच्या वातावरण स्थितींमध्ये बांधकाम करण्यासाठी केला जाऊ शकतो.





सारांश/समारोप

पोझ्झोलॅनिक सामुग्रीची हायड्रेटिंग पोर्टलॅंड सिमेंटने मुक्त केलेल्या कॅल्शिअम हायड्रॉक्साइडसोबत अभिक्रिया होऊन सिमेंटिटिअस संयुगे तयार होत असल्यामुळे पीपीसी अपारगम्यता आणि कॉंक्रीटची घनता वाढवते.  याचा उपयोग अतिशय आत्मविश्वासाने हायड्रोलिक संरचना, समुद्री कार्ये, मोठ्याप्रमाणावर कॉंक्रीटिंग इ.च्या बांधकामासाठी करता येतो. यामुळे कॉंक्रीटचे अल्कली ऍग्रिगेटच्या अभिक्रियांपासून रक्षण होते.


Loading....