संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



Home Is Your Identity,

Build It With India’s

No.1 Cement



घरबांधणीविषयी उपयुक्त सूचना

दिसून न येणारे तडे आणि खराब झालेली अंतर्गत/बाह्य सजावट हे नेहमीचेच दृश्य आहे.  हे कसे टाळावे हे पहा:

  •  चिकटण्याची क्रिया नीट घडावी म्हणून पृष्ठभाग नीट तयार करणे महत्त्वाचे असते.  पृष्ठभाग हा सुटे कण, धूळ आणि आणखी बऱ्याच बाबींपासून मुक्त असावा आणि विटांमधील/ब्लॉक्समधील सांधे नीटपणे साफ केले पाहिजेत.
  • प्लॅस्टर करण्यासाठी सौम्य मिश्रणांना (लीन मिक्सेस) पसंती दिली जाते, कारण जास्त किंवा कमी प्रमाणातील सिमेंट असलेली मिश्रणे तडकतात.
  • प्लॅस्टरिंग नमुनेदारपणे दोन थरांमध्ये केले जाते आणि दोन थरांमध्ये पुरेसा अवधी ठेवला जातो. 

नीटपणे तयार केलेले काँक्रीट जर नेमक्या जागेवर काँपॅक्ट आणि क्युअर केले नाही, तर ते वाया जाऊ शकते.  काँपॅक्टिंग कसे करावे ते पहा:

  • हवेच्या पोकळ्या राहिल्यामुळे झालेल्या अयोग्य काँपॅक्टिंगमुळे मजबुती कमी होते आणि त्यामुळे टिकाऊपणाही कमी होतो.
  • जास्त प्रमाणात काँपॅक्टिंग केल्याने सिमेंची पेस्ट तयार होऊन ते वेगळे होऊन वरच्या दिशेला येते आणि मिश्रण कमकुवत होते.
  • काँपॅक्टिंग परिणामकारकपणे केल्याने त्यातील घटक अधिक घट्टपणे एकजीव होतात व त्यामुळे अधिक घनता असलेले मिश्रण तयार होते.
  • क्युअरिंगची सुरुवात लवकर केली पाहिजे आणि आवश्यक ती मजबुती प्राप्त होण्यासाठी आणि तडा जाऊ नयेत म्हणून ती पुरेशा काळापर्यंत करीत राहिले पाहिजे.
  •  मध्येच क्युअरिंग करणे टाळले पाहिजे, कारण असे करणे हानिकारक असते. 

रिएन्फोर्समेंट बार्स हा आरसीसीचा महत्त्वाचा घटक असतो. आरसीसीला तडे जाऊ नयेत किंवा हानी पोहोचू नये म्हणून योग्य पोलादाचा वापर करून योग्य जागी ठेवणे महत्त्वाचे असते.

  • पोलाद खरेदी करताना ते नामवंत निर्मात्याकडून घेण्याची काळजी घ्या.
  • योग्य जागी न लावलेले रिएन्फोर्समेंट बार्स परिणामकारक नसतात आणि त्यांच्यामुळे सिमेंटमधील घटक नीट काम करीत नाहीत.
  • बार जोडताना त्यांच्यामध्ये पुरेसा दुपास्ता (लॅप लेंथ) ठेवा आणि तो एकमेकांवर चढवा (स्टॅगर्ड)
  • रिएन्फोर्समेंट बारची दाटीवाटी झालेय का आणि त्यांच्यावर काँक्रीटचे पुरेसे आच्छादन आहे का हे तपासून पहा. 

अशक्त आणि अस्थिर सेंटरिंग आणि फॉर्मवर्क यामुळे आयुर्मानावर परिणाम होतो/कमी होतो व त्याव्यतिरिक्त साहित्याचाही तोटा होतो.  सेंटरिंग आणि फॉर्मवर्क कसे केले गेले पाहिजे हे पाहू या:

  • ताजे काँक्रीट कडक होईपर्यंत ते हलू नये म्हणून सेंटरिंग पुरेशा प्रमाणात मजबूत असायला हवे.
  • स्थिरतेची खातरजमा करण्यासाठी सेंटरिंगला आधीच ठरवलेल्या अंतरावर पुरेसे ठोकळे लावले पाहिजेत.
  • सिमेंट लीक होऊ नये म्हणून सेंटरिंग शीटच्या मधील फटी भरल्या पाहिजेत, ज्यामुळे अन्यथा जाळीदार (हनीकाँब्ड)  काँक्रीट तयार होईल. 

तुमच्या घराच्या भिंती जर मजबूत आणि भक्कम नसतील, तर तुमचे घर सुरक्षित आहे असे समजले जाणार नाही.  तुम्ही खालील उपयुक्त सूचनांचे पालन केले पाहिजे:

  • विटा किंवा ब्लॉक्स सिमेंट व वाळूने तयार केलेला माल संपूर्ण भागावर पसरून त्यावर ठेवले पाहिजेत.
  •  सांधे पूर्णपणे भरले पाहिजेत आणि लिंपले पाहिजेत.
  • उभे सांधे वेगवेगळे आले पाहिजेत (एका रेषेत नकोत)
  • विटकाम मजबूत होण्यासाठी ते योग्यपणे क्युअर केले पाहिजे. 

हीन दर्जाच्या खडीमुळे काँक्रीटची गुणवत्ता कमी होईल व त्यामुळे बांधकामाचा टिकाऊपणा कमी होईल.  तुम्ही नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत असे काही मुद्दे येथे देत आहोत:

  • खडी ही कठीण, मजबूत, रसायनांचा परिणाम न होणारी आणि धोकादायक घटक नसलेली असायला हवी.
  • काँक्रीटमध्ये जेव्हा मालात पातळ, लांब, जाडेभरडी खडी/जेली असल्यास काँक्रीटच्या शक्तीवर परिणाम होतो.
  • क्युबिकल आणि ओबडधोबड खडीऐवजी इतर प्रकारच्या खडीला पसंती दिली जाते.
  • रेतीमध्ये गाळ, माती, गाठी, अभ्रभ आणि इतर अशुद्ध घटक असू नयेत.
  • कोणत्याही खडीचे जास्त प्रमाण झाल्यास त्याचा काँक्रीट सेट होण्यावर, कडक होण्यावर, मजबुतीवर आणि टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. 

सिमेंट आर्द्रतेच्या बाबतीत खूप संवेदनशील  ते आर्द्रतेच्या संपर्कात आले की कठीण बनते. सिमेंट खालीलप्रकारे साठवले पाहिजे:

  •  सिमेंट पाणी जाणार नाही अशा प्रकारच्या शेडमध्ये साठवून ठेवले पाहिजे.
  • सिमेंटच्या गोणी उंचीवर असलेल्या प्लॅटफॉर्मवर रचून ठेवल्या पाहिजेत आणि साईटवरच्या तात्पुरत्या साठ्यासाठी ताडपत्रीने/पॉलिथीन शीट्‌सने झाकले पाहिजे.

वाळवी लागल्यास बांधकाम कमकुवत होते आणि लाकडी पृष्ठभागांना हानी पोहोचते.  बांधकाम सुरू करण्यापूर्वी वाळवी विरुद्ध उपचार सुरू करा.  तुमच्या घरापासून वाळवीला दूर ठेवण्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला हवे आहे ते पहा:

  • पायाभोवतीच्या मातीमध्ये जोत्याच्या पातळीपर्यंत केमिकल लावले पाहिजे.
  • केमिकलचा अडथळा पूर्ण आणि सातत्यपूर्ण असला पाहिजे.
  • बांधकाम करण्यापूर्वी, बांधकामाच्या दरम्यान आणि बांधकाम झाल्यानंतर उपचार केले जाऊ शकतात.
  • केमिकल्समुळे पिण्याचे किंवा वापरण्याचे पाणी दूषित होणार नाही ह्याची काळजी घेतलीच पाहिजे. 

  •  नवीन भिंतींसाठीचा पायाकरिता योग्यपणे खुणा केल्या पाहिजेत, ज्यामुळे भिंतींचे वजन पेलण्यासाठी योग्य आकारमानाचा आणि योग्य ठिकाणी पाया खोदला जाईल.
  • इंजिनिअरकडून लेआऊट प्लॅन/सेंटर-लाईन ड्रॉईंग प्राप्त करा आणि इमारतीच्या सर्वात लांब बाह्य भिंतीची सेंटर लाईन ही जमिनीत रोवलेल्या खुंट्यामध्ये संदर्भ रेषा म्हणून वापरा.
  • भिंतीच्या सेंटर लाईनचा संदर्भ घेऊन खड्डे खोदण्यासाठी रेषा आखा.
  • खोदलेले खड्डे पातळी, उतार, आकार आणि आकृतिबंध यांच्या बाबतीत तद्रूप असतील ह्याची खातरजमा करा.
  • भरून झालेला खड्डा अधिक टणक बनविण्यासाठी त्यावर पाणी मारा आणि धुमसने ठोका.  मऊ किंवा सदोष भाग खोदून काँक्रीटने भरला पाहिजे.
  • खोल असलेल्या खोदकामासाठी त्याच्या बाजू कोसळू नयेत म्हणून त्यांना घट्ट शोरिंग बांधा.

तुमच्या इमारतीचा पाया जर नीट नसेल, तर संपूर्ण बांधकाम कोसळेल किंवा बुडेल.  पाया मजबूत असल्याची खातरजमा करण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा.

  • पाया घट्ट मातीवर बांधला पाहिजे आणि तो जमिनीच्या पातळीपासून किमान १.२ मीटर खोल खोदला पाहिजे.
  • माती सैल असेल आणि/किंवा खोदकामाची खोली खूप असेल, तर खोदकामाच्या बाजू कोसळू नयेत म्हणून त्यांना आधार दिला पाहिजे.
  • पाया ज्या जमिनीवर असेल त्या जमिनीवर भार पाठविण्यासाठी पायाचे क्षेत्र पुरेसे असले पाहिजे.
  • मातीची भार पेलण्याची क्षमता लक्षात घेऊन पायाचे क्षेत्र निश्चित केले पाहिजे.  खोदकाम करण्यापूर्वी पायाची जागा आणि आकारमान यांच्या खुणा करणे महत्त्वाचे असते. 



अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स

२००७ साली पहिले अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स लोकेशन सुरू झाल्यानंतर अल्ट्राटेकची वाढ एवढी वाढ झालेली आहे की, आता भारतभर अशी २५०० पेक्षाही अधिक लोकेशन्स आहेत.  विविध उत्पादनांच्या संवर्गांसाठी आम्ही अग्रगण्य ब्रँड्‌ससोबत उत्तम संबंध प्रस्थापित केलेले आहेत.  लाखो लोक अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी होम बिल्डिंग सोल्युशन्स, सेवा आणि सोल्युशन्ससाठी नेहमीचेच ठिकाण बनले आहे. 



Loading....