जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तांत्रिक दस्तऐवजांची प्राथमिक माहिती असणे अडचण विरहित खरेदी प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे.
1
टायटल म्हणजे जमीन किंवा मालमत्तेची मालकी घेण्याचा कायदेशीर अधिकार होय, आणि करारनामा किंवा डीड व्यक्तीचा यावरच्या स्वामीत्वाचा अधिकार अधोरेखीत करते. खरेदी करणारा व विक्री करणारा यांच्यात करार झाल्यावर, खरेदी करणारा मालमत्तेवर मालमत्ता नोंदणीमार्फत औपचारीकपणे कायदेशीर स्वामीत्व मिळवतो. सेल डीड दस्तऐवज याला प्रतिबिंबित करतो.
2
भारताच्या नोंदणीकरण अधिनियम १९०८ अन्वये सेल डीडची नोंदणी होणे आवश्यक आहे ज्यामुळे मालमत्तेचे मालकाच्या नावावर झालेले स्थानांतर कायदेशीर पुरावा बनते. न्यायालयात दस्तऐवज सत्यापित झाल्यावर सेल डीड खरेदी करणा-या व्यक्तीसाठी टायटल डीड बनते, यामुळे या दोन संज्ञा अदलाबदल करुन वापरता येतात.
3
नवीन घराच्या बांधकामासाठी जमीन खरेदी करताना विक्रेत्याने
त्यांच्या मालमत्तेवरच्या मूळ अधिकाराची पुष्टी देण्यासाठी मूळ
दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.यामुळे खासकरुन कृषी मालमत्तेच्या दाव्यांपासून सहजपणे बचाव करता येतो.
यामुळे पुर्वापारच्या मालमत्तेच्या
मालकीच्या दाव्यांच्या संपूर्ण साखळीला प्रदर्शित करता येते.
4
टायटल डीड गृहकर्ज मिळवताना आवश्यक असते.
जर तुम्हाला जमीन खरेदी नंतर घर बांधण्यासाठी कर्ज
घ्यायचे असल्यास हा मालकीचा दस्तऐवज सदर जमीनी
च्या मालमत्तेच्या अधिकारांचा पुरावा असतो. बॅंक या
दस्तऐवजाचा उपयोग तुमच्या भूखंडाच्या मालकीचे
स्थानांतरण करण्यासाठी जर त्यांची थकबाकी भरली गेली
नसल्यास तिच्या वसूलीसाठी करु शकते.
या सर्व कारणांस्तव, टायटल डीड ताब्यात घेणे आणि तुमच्या मालमत्तेचे टायटल स्पष्ट करणे तुम्ही भूखंड खरेदी करताना तुमचे सर्वप्रथम प्राधान्य असणे गरजेचे आहे.
घर बांधण्यासाठी अशा आणखी टिप्ससाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी वर ट्यून इन करा
This website uses cookies to serve content relevant for you and to improve your overall website
experience.
By continuing to visit this site, you agree to our use of cookies.
Accept