घर बांधणे हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. तुमचे घर ही तुमची ओळख असते. म्हणूनच आपल्या घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काय केले पाहिजे हे तुम्हाला माहित असायला हवे. तुमच्या घराच्या बांधकामाचे विविध टप्पे जाणून घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या नवीन घराच्या बांधकामाचे नियोजन करू शकता आणि त्याचा मागोवा घेऊ शकता.
तुमच्या घराच्या बांधकामाचे नियोजन तुम्हाला केवळ बजेटचा अंदाजच देत नाही तर महागड्या चुका टाळण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही घराच्या बांधकामाचे योग्य नियोजन करता तेव्हा आपण सामुग्रीचा दर्जा, इंटिरियरचे बजेट ठरवू शकता आणि प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक कॅशफ्लोची व्यवस्था करू शकता. सुदैवाने, तुमच्या घराच्या बांधकामाबद्दल आपल्याला अधिक माहितीवर मदत करण्यासाठी भारताचे नंबर 1 सिमेंट आहे.
नियोजनापासून समापनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर टिप्स आणि तज्ञांच्या सल्ल्यासह तुम्ही तुमचे घर बांधण्यास सज्ज होऊ शकता.
तुमच्या घराच्या निर्माणाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मजबूत आणि कणखर पाया/जोते घालणे होय. सर्व प्रथम स्थळावरुन दगड व डेब्रिज काढूओन टाकावा. उत्खनन सुरु करण्याआधी स्थळावरच्या पाण्याची चाचणी करुन घ्यावी आणि प्लॅनप्रमाणे आराखड्याचे रेखांकन असण्याची शाश्वती करावीए. तुमची बांधकाम टिम स्थळाचे लेव्हलिंग करेल, पाया/जोती घालण्यासाठी छिद्रे पाडेल आणि चरे खणेल.
एकदा कॉंक्रीट ओतले की, त्याला सेट होण्यासाठी सोडले पाहिजे आणि नंतर ते नीट क्युअर व्हायला हवे. क्युअरींग नंतर वॉटरप्रुफिंग आणि वाळवी प्रतिबंधक उपचार करणे यथोचित असते. अल्ट्रा टेक ILW+ डॅंप प्रुफ किंवा आर्द्रता प्रतिबंधक कोर्स घालण्यासाठी आदर्श आहे. मग तुमच्या टिमने जोत्याच्या भिंतींच्या सभोवतालचा परिसर पुन्हा चिखलाने भरला पाहिजे.
पाया घातल्यावर पुढचा टप्पा म्हणजे घराचा ढाचा तयार करणे. यामध्ये प्लिंथ, बीम, कॉलम, भिंती, छताचे स्लॅब्स सोबत खिडक्या व दारांच्या चौकटी घालण्याचा समावेश होतो. खोल्यांची विभागणी होऊन तुमचे नवीन घर नक्की कसे बांधले जाईल ते कळेल. घराच्या बीम्स व कॉलमची योग्य दखल घ्या, कारण ते ढाच्याच्या बहुतांश भागाचा भार सहन करतात. हा बांधकामाचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे, कारण यामध्ये तुमच्या घराची दृढता व ढाचा ठरतो. त्यामुळे तुमच्या नवीन घराच्या बांधकामाचे पर्यवेक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे.
तुमच्या घराचा ढाचा तयार झाला की, तुम्ही प्लंबिंग व इलेक्ट्रिकल सिस्टिम इनस्टॉल करणे सुरु करु शकता. तुम्ही इलेक्ट्रिकल बोर्ड व स्विचेसची प्रवेशानंतर अनियंत्रित ऍक्सेस ठेवला असण्याची खात्री करा.दूषण टाळण्यासाठी सांडपाण्याचे पाइप नेहमी पिण्याच्या पाण्याच्या पाइप्सच्या खाली असले पाहिजेत.
एकदा वॉल फिनिशने भिंती प्लॅस्टर केल्या गेल्या की खिडक्या व दारे बसवावी लागतात. खिडक्या व दारे इन्सुलेशन आणि वायुविजन देतात. त्यामुळे तुमच्या कंत्राटदाराशी वापरल्या जाणा-या यथोचित सामुग्रीबद्दल बोला.
शेवटी, तुमची बांधकाम टिम टाइल्स घालेल, इलेक्ट्रिक बोर्ड्स, कॅबिनेट्स, किचनमधल्या काउंटर टॉप्सना बसवेल.तुमच्या घराच्या फिनिशिंग डेकोरबद्दल घरातल्या मंडळींसोबत चर्चा करा.
लक्षात ठेवा, घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण आहे याची खात्री करण्यासाठी पर्यवेक्षण महत्वाचे आहे. आदर्शपणे, प्रगती आणि यादीचा आढावा घेण्यासाठी आपण दररोज साइटला भेट दिली पाहिजे. आपल्या नवीन घराच्या बांधकामाच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला मदतीची आवश्यकता असल्यास, आपण तज्ञांच्या सल्ल्यासाठी किंवा योग्य बांधकाम साहित्य शोधण्यासाठी आपल्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअरला भेट देऊ शकता.
गृहनिर्माणाच्या अशा प्रकारच्या आणखीन टिप्ससाठी आणि सल्ल्यांसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #गोष्ट घराची च्यासंपर्कात रहा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा