Stages of Building New Home Stages of Building New Home

वॉटरप्रूफिंग म्हणजे काय? महत्त्व, प्रकार आणि स्टेप्स

तुमचे घर आपल्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी केवळ निवा-याहून बरेच काही आहे. ते तुमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे. हे आराम देते आणि अनेक घटकांपासून तुमचे रक्षण करते. म्हणूनच यामुळेच तुम्ही बराच वेळ, पैसा आणि उर्जा खर्च करता घर बांधता जे पिढ्यानुपिढ्या टिकू शकेल.

तुम्ही घराला काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन बांधता ज्यामुळे घर ओलसर होत नाही किंवा स्लॅबची गळती होत नाही. कारण यामुळे तुमच्या घराच्या टिकाऊपणावर गंभीरपणे परिणाम होतो आणि त्याच्या संपूर्ण सामर्थ्यासोबत तडजोड होऊ शकते.
ओलावा का निर्माण होतो
ओलावा का निर्माण होतो

ओलावा एखाद्या कारणामुळेच होतो असे नाही, पण सतर्कतेत एखादी गल्लत झाल्यास तो येऊ शकतो. आणि तुमच्या संरचनेवर गंभीर परिणाम करतो. ओलाव्याची काही कारणे खाली दिली आहेत.

1
खराब वायुवीजन
2
खोल्यांमध्ये अपुरी ऊब
3
भिंतींचे खराब इन्सुलेशन
4
ओलसर कपडे,
झाडे, स्वयंपाक आणि स्नानगृहासारखे पाण्याचे स्त्रोत
5
भेगा असलेल्या भिंती,
गळकी छप्परे आणि खिडक्यांमधून पावसाचे पाणी झिरपणे
6
भिंतींनी,
लाद्यांनी पाणी शोषणे ज्यामुळे देखील ओल वाढू शकते
 
स्लॅब झिरपणे म्हणजे काय?

जेव्हा अयोग्य उतार किंवा पावसाच्या पाण्याच्या तुंबलेल्या पाईपमुळे छतावरील स्लॅबवर पावसाचे पाणी साचून स्लॅब गळतो. निकृष्ट दर्जाचे कॉंक्रीट ही समस्या आणखीन गंभीर करते. कालांतराने हे साचलेले पाणी कॉंक्रिटमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे एंबेडेड स्टील गंजते आणि आतून ओलावा निर्माण होतो. परिणामी, यामुळे कॉंक्रिटचे विघटन होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी, स्लॅब कास्टिंगच्या वेळी अत्यंत काळजी घेतली पाहिजे आणि पावसाच्या पाण्याच्या पाइपमधून पाण्याचा योग्य प्रवाह सुलभ होण्यासाठी पुरेसा उतार ठेवला पाहिजे. कोणत्याही घरात स्लॅब गळती होऊ शकते, म्हणूनच तुमच्या घराला जल प्रतिरोधक बनविणे खूप महत्वाचे आहे.

वॉटरप्रुफिंग म्हणजे काय आहे आणि
हे का महत्वाचे आहे?
वॉटरप्रुफिंग म्हणजे काय आहे आणि
हे का महत्वाचे आहे?

तुमच्या घराचा पाणी झिरपण्यापासून बचाव करण्यासाठी वॉटरप्रुफिंग उत्तम उपाय आहे. काँक्रीट वॉटरप्रूफिंगमध्ये वॉटरप्रूफिंग मटेरियलसह कॉंक्रिटवर कोटिंग करणे समाविष्ट आहे , ज्यामुळे भिंती, छप्पर, फरशी इत्यादीमधून पाणी आणि ओलावा झिरपणे थांबवता येते. वॉटरप्रूफिंग का महत्वाचे आहे हे समजण्यासाठी, पाण्याचे झिरपणे खरोखर का नकोसे असते ते पाहूया:

पाण्याचे झिरपणे केवळ कॉस्मेटिक समस्या नाही. तपासणी न केल्यास, यामुळे भिंतींवर बुरशी येऊ शकते, ज्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ..
तसेच, जर वीजेच्या तारांपर्यंत पाणी पोहोचले तर यामुळे शॉर्ट सर्किट्स होऊ शकतात आणि आग लागू शकते. ओलावा तुमचे साहित्य आणि मौल्यवान वस्तू देखील नष्ट करू शकतो.
सर्वात वाईट परिस्थितीत, पाण्याच्या झिरपण्यामुळे भिंतीं कुजणे किंवा पाया बुडण्यासारखे गंभीर संरचनात्मक नुकसान होऊ शकते. आणि क्षतीची दुरुस्ती करणे एक कंटाळवाणे आणि महागडे काम आहे.
 

म्हणून तुमच्या घराचे झिरपण्यापासून अगदी
सुरुवातीपासूनच संरक्षण करणे अतिशय महत्वाचे असते.

वॉटरप्रुफिंग कुठे केले गेले पाहिजे?
वॉटरप्रुफिंग कुठे केले गेले पाहिजे?

काँक्रीट वॉटरप्रुफिंग तुमच्या घराच्या पाणी साचण्याची शक्यता असणा-या किंवा पाण्याशी सतत संपर्कात येणा-या भागात अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये बाथरूम आणि स्वयंपाकघर किंवा वातावरणाशी संपर्क येणारे भाग उदा.छप्पर, बाल्कनी, बाहेरच्या भिंती, तळघर आणि पाण्याचा संग्रह केल्या जाणा-या क्षेत्रांचा समावेश होतो.

वॉटरप्रुफिंग सोल्युशनचे प्रकार

आज बर्‍याच प्रकारची वॉटरप्रुफिंग सोल्युशन्स उपलब्ध आहेत. तुमच्या घरासाठी सर्वोत्कृष्ट सोल्युशन शोधण्यासाठी आपल्या वॉटरप्रुफिंग कंत्राटदाराशी चर्चा करा. अल्ट्राटेक सील आणि ड्राय-- तुमच्या घराच्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी विशेष तयार केलेल्या वॉटर प्रूफिंग एजंट्सची मोठी रेंज अतिशय लोकप्रिय उपाय आहे. प्लास्टर, मॉर्टर आणि काँक्रीटचे आणि पर्यायाने तुमच्या घराचे जल प्रतिरोधक गुणधर्म सुधारण्यासाठी हे डिझाइन केलेले आहेत. तुमच्या बांधकामातल्या आर्द्रतेपासून बचाव करण्याचे काही मार्ग पाहू या:

1
मेंब्रेन डॅंप प्रुफिंग
हे आर्द्रता प्रतिबंधक कोर्स देते आणि हा एक स्वस्त पर्याय आहे. हे लावणे अतिशय सोपे आहे.
2
सर्फेस उपचार
जल प्रतिरोधक सामुग्रीने बाहेरच्या भिंतींवर उपचार करण्यासाठी हे सोल्युशन वापरतात.
3
कॅव्हिटी वॉल कंस्ट्रक्शन
म्हणजे तुमच्या घरात पाण्याचे झिरपू नये म्हणून पोकळी तयार करणे. हे अतिरिक्त बाह्य भिंत तयार करुन केले जाते.

वॉटरप्रुफिंग प्रक्रियेत
आंतर्भूत होणारे टप्पे

1
एकदा तुम्ही तुमचा वॉटरप्रुफिंग एजंट निवडल्याला की, तुमच्या घराच्या भिंती गुळगुळीत करण्यासाठी ग्राइंडिंग केले जाते.
2
जल प्रतिरोधक बॅरियरमध्ये कोणतेही अंतर नाही याची खात्री करण्यासाठी भेगा कॉंक्रीट पॅचने भरल्या जातील.
3
भिंती पूर्णपणे स्वच्छ केल्या जातात जेणेकरून वॉटरप्रुफिंग एजंट कॉंक्रिटसह चांगला बंध तयार करु शकेल.
4
वॉटरप्रुफिंगचा कोट भिंतींवर लावला जातो

वॉटरप्रुफिंगचे कोणते लाभ आहेत?

वॉटरप्रुफिंग तुमच्या संरचनेचा टिकाऊपणा वाढवते, भिंतींमधल्या गंजण्यावर आणि क्षरणावर आळा आणला जातो. हे बुरशीच्या वाढीस प्रतिबंध देखील करते ज्याने ऍलर्जी किंवा दम्याचा त्रास टाळण्यास मदत होते. शिवाय, हे पाण्याच्या क्षतीमुळे व्यापक दुरुस्तीची बचत होते आणि तुमच्या मालमत्तेचे मूल्य टिकवून ठेवण्यास मदत मिळते.

गृहनिर्माणाच्या अशा प्रकारच्या आणखीन टिप्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #गोष्ट घराची च्या संपर्कात रहा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा