आम्हाला याची कल्पना आहे की काही लोक जनतेला कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशीप आणि रिटेल आउटलेट डिलरशीप आणि मोठ्या प्रमाणावर/उत्पादनांची उच्च सवलतीच्या दरात विक्री करण्याचे आमिष दाखवतात आणि प्रक्रियेमध्ये आगाऊ रक्कम मागतात. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (यूटीसीएल)च्या नावाचा व लोगोचा ते अवैधपणे उपयोग करतात आणि स्वत:ला यूटीसीएलचे अधिकृत प्रतिनिधी म्हणवून घेतात.
कृपया याची नोंद घ्या की, यूटीसीएल एसएमएस, व्हॉट्सऍप मेसेज, कॉल्स, ईमेल्सद्वारे किंवा सोशल मीडिया मार्फत कधीही आपल्या मालाची विक्री करत नाही आणि कधीही ग्राहकांकडून त्यासाठी नेट बॅकिंग किंवा इतर माध्यमाने आगाऊ रकमेची मागणी करत नाही.
कृपया अशा लोकांवर विश्वास ठेवू नका आणि जर तुमच्याशी कोणी अल्ट्राटेकची उत्पादने देण्यासाठी कोणत्याही माध्यमाने संपर्क साधला, त्यांच्या बॅंक खात्यात अग्रिम रक्कम जमा करण्याची मागणी केली तर कृपया या घटनेची जवळच्या डिलरकडे किंवा अधिकृत रिटेल स्टॉकिस्टकडे सूचना द्या किंवा कंपनीच्या 1800 210 3311 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.
कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा साहाय्यासाठी, कृपया आमचा 1800 210 3311 टोल फ्री क्रमांक डायल करा किंवा आमच्या www.ultratechcement.com अधिकृत वेबसाइटला भेट द्या