छत हा तुमच्या घराचा महत्त्वाचा भाग आहे, जे बाहेरील वारा, पाणी आणि ऊन यांपासून त्याचे संरक्षण करते. म्हणूनच ह्या सगळ्यांचा सामना करणारे छत बांधणे महत्त्वाचे असते. छताचे अनेक प्रकार असले, तरी आपल्या देशात सर्वसाधारणपणे आरसीसी रूफिंगचा वापर केला जातो. ह्या प्रकारचे छत बांधण्याचे टप्पे असे आहेत.
कॉलम्स, बीम्स आणि भिंती बांधून सुरुवात करा.
त्यानंतर छताच्या शटरिंगचे काम करा, जे लाकूड किंवा लोखंडाचे बनलेले असते. त्याला आधार देण्यासाठी बांबू किंवा परांचीचा उपयोग करा, ज्यामुळे स्लॅबच्या वजनामुळे ते कोसळणार नाही.
स्लॅबच्या वर लोखंडी सळ्यांची जाळी ठेवा. बाजूंच्या सळ्या वाकवलेल्या असल्या पाहिजेत. कव्हर ब्लॉक्स हे लोखंडी सळ्यांच्या खाली ठेवलेले असतात, ज्यांच्यामुळे सळ्या त्यांच्या जागेवरून हलत नाहीत.
त्यानंतर सीमेंट, रेती आणि खडी यांपासून काँक्रीटचे मिश्रण तयार करा आणि वेदर प्रोसारखे वॉटरप्रूफिंग कंपाऊंड त्यात मिसळा.
काँक्रीट टाकून ते एका पातळीत सपाट करा, त्याचे काँपॅक्टिंग होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर फिनिशिंगचे काम सुरू करा.
स्लॅबला क्युअर करण्यासाठी छोटे छोटे बांध घालून डबकी तयार करा. २-३ आठवड्यांमध्ये क्युरिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. तुमचा स्लॅब एकदा मजबूत झाला, की तुम्ही काळजीपूर्वक शटरिंग काढून टाकू शकता.
अशाच प्रकारच्या घरबांधणीविषयीच्या आणखी उपयुक्त सूचनांसाठी ट्यून करा #बातघरकी अल्ट्राटेक सीमेटच्या वतीने
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा