Important Legal Papers While Buying Land

जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याकडे ही कागदपत्रे असल्याची खात्री करा

घर निर्माणासाठी तुमचा भूखंड खरेदी करणे हा सर्वप्रथम टप्पा आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक दस्तऐवज जागेवर असल्याची तुमच्या घराच्या बांधकामाआधी खात्री करा, ज्यामुळे पुढे कायदेशीर अडचणी येत नाही.

मदर डीड

मदर डीड मालमत्तेची मालकी निश्चित करण्याचा मुख्य दस्तऐवज आहे. यात जमीनीच्या मालकीच्या साखळीचा मागोवा घेतात आणि भूखंडाच्या इतिहासाबद्दल माहिती दिली जाते.

पाव्हर ऑफ ऍटर्नी (पीओए)

जर जमीन विकणारा मालक नसेल तर त्यांच्याकडे पॉवर ऑफ अॅटर्नी असणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना भूखंड विकायला अधिकृतता मिळते. कोणत्याही विक्रेत्याकडून खरेदी करताना नेहमीच पॉवर ऑफ ऍटर्नी तपासा.

सेल्स डीड

सेल्स डीड/विक्री करारात विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे जमीनीची मालकी स्थानांतरीत केल्याची नोंद असते. तुम्ही त्याचे सब-रजिस्ट्रार कार्यालयात सत्यापन करू शकता.

एन्कबरन्स सर्टिफिकेट/भार प्रमाणपत्र (इसी)

एन्कबरन्स सर्टिफिकेट/भार प्रमाणपत्रात जमीनीशी संबंधित सर्व व्यवहारांचे दस्तऐवज असते. आपण खरेदी करत असलेली जमीन कोणत्याही आर्थिक किंवा कायदेशीर बंधनांशिवाय मुक्त आहे याचा पुरावा म्हणून हे कार्य करते.

खाते प्रमाणपत्र

बांधकामाचा परवाना मिळविण्यासाठी खात्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यात स्थान, आकार, बिल्ट-अप क्षेत्रफळ इत्यादी मालमत्तेचा तपशील असतो आणि मालमत्ता कर भरण्यासाठी आणि बांधकामाचा परवाना मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे.

सर्व योग्य कायदेशीर दस्तऐवजीकरण नीट असल्यावर भविष्यात कोणत्याही वादापासून तुमच्या जमीनीचे आणि घराचे संरक्षण होईल. दस्तऐवजीकरण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात मदत करण्यासाठी वकीलाचा सल्ला घ्या.

या तुमच्या घराच्या बांधकामाच्या दरम्यान क्युअरींगच्या काही टिप्स होत्या ज्यामुळे तुमच्या घरातल्या भेगा टाळता येतात. अशा आखणीन टिप्ससाठी येथे भेट द्या: www.ultratechcement.com

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा