आपले घर बांधताना पाइप आणि वायर भिंतीमध्ये कन्सिल करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या घराची दृश्यता आणि सजावट तशीच राहते, घर मॉर्डन आणि कुटुंबासाठी राहण्यायोग्य बनते. तुमच्या घराच्या भिंतींमध्ये पाइपच्या कन्सिलिंगसाठी इथे टप्प्याप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.
सर्वप्रथम, टॅप, शॉवर आणि वॉशबेसिन यांसारख्या पाइप आउटलेटचे मार्ग चिन्हांकित करण्यासाठी स्पिरिट लेव्हल वापरा आणि पिण्याच्या पाण्याचे पाइप आणि ड्रेनेज पाइप एकमेकांवर न येण्याची खात्री करा.
नंतर डिस्क ब्लेडच्या सहाय्याने चिन्हांकित भाग कापा, कट पाइपच्या जाडीपेक्षा 4-6 मिमी जास्त असण्याचे सुनिश्चित करा. प्रक्रियेत तुमच्या घराचा कोणताही कॉलम किंवा बीम कापला न जाण्याची खात्री करा.
चिन्हांकित भागात खाच करण्यासाठी स्पेड वापरा. जर भिंत लोड-बेअरिंग भिंत असेल, तर संपूर्ण चिन्हांकित क्षेत्र एकाच वेळी न फोडण्याची खात्री करा.
पाइप बसवा खाचेत खिळ्यांच्या मदतीने पाइप्स बसवा.
पाइप आणि भिंतींच्या मधल्या भेगा सिमेंट व सॅंड मॉर्टरने भरा.
भिंतीत भेगा टाळण्यासाठी स्टील मेश वापरा. याला भेगेवर बसवा आणि खिळे व मॉर्टरच्या मदतीने बसवा.
सर्वोत्तम प्लंबिंग सामुग्री आणि अधिक तज्ञ समाधानांसाठी तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन स्टोरला भेट द्या.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा