तुमच्या घराच्या बांधकामाचे नियोजन करताना, बदलाण्या हवामानाला लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. हिवाळा घराच्या बांधकामासाठी सर्वात चांगला ऋतू आहे. चला तर हिवाळ्यातल्या बांधकामाबद्दल महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया.
पाऊस किंवा जीवघेणा ऊष्मा नसल्यामुळे हिवाळ्यात सुरळीपणे बांधकाम होऊ शकते.
जेव्हा तापमान खाली जाते, कॉंक्रीटला सेट व्हायला अधिक वेळ लागतो, आणि वेग कमी झाल्याने त्याची दृढता वाढते.
म्हणून, कॉंक्रीट भरपूर सूर्यप्रकाश असताना मिसळावे. तुम्ही मिक्सिंगसाठी गरम पाणी देखील वापरु शकता.
कॉंक्रीटला तारपोलिन किंवा प्लॅस्टिकने झाकून ठेवावे, ज्यामुळे त्याचे गोठण्यापासून रक्षण होईल.
इंजिनियरच्या पर्यवेक्षणाखाली तुम्ही ऍडमिक्श्चर्स देखील वापरु शकता.
हिवाळ्यामध्ये दृढतेचा वेग मंद असल्यामुळे, खालील वेळापत्रकानुसार शटरींग काढावे: बीम्स, भिंती आणि कॉलम्स- ५ दिवसांनी, स्लॅबच्या खालचे प्रॉप्स- ७ दिवसांनी, स्लॅब- १४ दिवसांनी, बीम सपोर्ट-२१ दिवसांनी.
तज्ञ बांधकाम समाधाने, टिप्सबद्दल अधिक माहितीसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा