संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj


पोर्सेलिन विरुद्ध सिरॅमिक: फरक काय आहे आणि आपण कोणती निवड करावी?

फरश्या ह्या गोंधळात टाकणारी गोष्ट असू शकतात परंतु ते प्रत्येक खोलीचा अविभाज्य भाग बनतात. पोर्सेलिन विरुद्ध सिरॅमिक फरश्यांमधील फरक जाणून घ्या आणि आपल्या पुढील प्रकल्पासाठी एक माहितीपूर्ण निर्णय घ्या.

Share:


जेव्हा आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी योग्य फरशी निवडण्याची वेळ येते तेव्हा भरपूर पर्याय समोर येऊ शकतात. पोर्सेलिन आणि सिरॅमिक फरशी हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत जे टिकाऊपणा, अष्टपैलूपणा आणि सौंदर्यात्मक मोहकता देऊ करतात. पोर्सेलिन विरुद्ध सिरॅमिक मधील फरक समजून घेतल्यास आपल्याला आपल्या गरजा आणि प्राधान्यांनुसार माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. या ब्लॉगमध्ये, आपण पोर्सिलेन आणि सिरॅमिक फरश्यांमधील वैशिष्ट्ये आणि फरकांबद्दल समजून घेऊन, त्यांचे अद्वितीय गुण जाणून घेऊ आणि अंतिम निवड आपल्यावर सोडू.



पोर्सिलिन फरशी म्हणजे काय?



पोर्सिलेन फरशी ही एक प्रकारची सिरॅमिक फरशी आहे जी बारीक चिकणमातीवर उच्च तापमानावर प्रक्रिया करून बनविली जाते. ही फायरिंग(भाजण्याची) प्रक्रिया 0.5% पेक्षा कमी पाणी शोषण दरासह एक सघन आणि अधिक टिकाऊ फरशी तयार करते. पोर्सिलेन फरश्यांची घनता त्यांना डाग, स्क्रॅच आणि ओलावा यासाठी अत्यंत प्रतिरोधक बनवते, ज्यामुळे त्या बाथरूम आणि स्वयंपाकघर(किचन) यासारख्या उच्च वापर किंवा पाण्याच्या संपर्कात असलेल्या भागांसाठी एक उत्कृष्ट निवड बनतात. पोर्सिलेन फरश्या विविध रंग, नक्षी(पॅटर्न) आणि फिनिशसह डिझाइन पर्यायांची विस्तृत श्रेणी देखील प्रदान करतात.

 

पोर्सिलेन फरश्यांचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांची विस्तृत डिझाइन अष्टपैलूता. ते विविध रंग, नक्षी(पॅटर्न) आणि फिनिशमध्ये येतात, ज्यामुळे इंटिरिअर डिझाइनमध्ये अनंत अभिनव शक्यता निर्माण होतात. स्लीक आणि पॉलिश पासून ते टेक्स्चरड आणि रस्टीक पर्यंत, पोर्सिलिन फरश्या नैसर्गिक दगड, लाकूड किंवा अगदी कापडाच्या रंगरूपाची नक्कल करू शकतात, ज्यामुळे आपण आपल्या जागेसाठी इच्छित सौंदर्य प्राप्त करू शकतात. याव्यतिरिक्त, जेव्हा ग्राउटिंगचा विचार केला जातो तेव्हा पोर्सेलिन फरश्यांसह इपॉक्सी ग्राउट वापरल्याने टिकाऊपणा आणि डाग प्रतिकार वाढू शकतो, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी आणि देखभाल करणे सोपे असलेले इंस्टॉलेशनची खात्री होते.


सिरॅमिक फरशी म्हणजे काय?



दुसरीकडे, सिरॅमिक फरश्या माती, खनिजे आणि पाण्याच्या मिश्रणापासून बनविल्या जातात. ते पोर्सिलेन फरश्यांपेक्षा कमी तापमानावर भाजल्या जातात, परिणामी थोडे कमी सघन आणि अधिक सच्छिद्र उत्पादन तयार होते. सिरॅमिक फरश्यांमध्ये सामान्यत: 0.5% पेक्षा जास्त पाणी शोषण दर असतो. जरी त्या पोर्सेलिन फरश्यांपेक्षा किंचित कमी टिकाऊ असू शकतात, तरीही त्या झीज व तुटफुटीला चांगला प्रतिकार प्रदान करतात, ज्यामुळे त्या बहुतेक निवासी अनुप्रयोगांसाठी योग्य ठरतात. सिरॅमिक फरश्या विविध शैली, आकार आणि पोत(टेक्श्चर)मध्ये येतात, ज्यामुळे आपल्या जागेत अभिनव प्रयोग आणि सानुकूलन(कस्टमायझेशन) करणे शक्य होते.

 

सिरॅमिक फरश्या विविध डिझाइन प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या शैली, आकार आणि पोत देऊ करतात. आपण सोज्वळ आणि मिनिमलिस्ट लुक किंवा बोल्ड आणि व्हायब्रंट स्टेटमेंट पसंत करत असाल, तर आपल्या इच्छित सौंदर्याला साजेसे अशा सिरॅमिक फरश्या उपलब्ध आहेत. ते मॅट, ग्लोसी(चमकदार), पोतदार(टेक्श्चरड्) आणि अगदी नक्षीदार रचनेच्या पर्यायांसह विविध फिनिशमध्ये आढळून येतात.


पोर्सेलिन विरुद्ध सिरॅमिक फरश्यांमध्ये कोणती चांगली आहे?


पोर्सिलिन किंवा सिरॅमिक फरशी यातील कोणती चांगली आहे हे ठरविणे अंतिमत: आपल्या विशिष्ट गरजा आणि फरशी ज्या ठिकाणी बसवली जाईल तेथील वातावरणावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारासाठी विचारात घेण्यासारखे काही मुख्य गुणधर्म येथे आहेत:

 

1. टिकाऊपणा

पोर्सिलेन फरश्या अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असतात, ज्यामुळे ते चिप्स, स्क्रॅच आणि ओलाव्यास अत्यंत प्रतिरोधक असतात. सिरॅमिक फरश्या, किंचित कमी सघन असल्या तरी, टिकाऊ असतात आणि बहुतेक निवासी अनुप्रयोगांसाठी योग्य ठरतात.

 

2. जल प्रतिरोध

पोर्सिलेन फरश्यांमध्ये पाणी शोषण्याचा दर कमी असतो, ज्यामुळे ते पाण्याच्या नुकसानी विरुद्ध अत्यंत प्रतिरोधक बनतात. सिरॅमिक फरश्या, जरी अधिक सच्छिद्र असल्या तरी, त्या अशा भागात वापरल्या जाऊ शकतात जिथे पाण्याचा संपर्क कमीतकमी असतो किंवा योग्यरित्या सील केलेला असतो.

 

3. डिझाइन पर्याय ऑप्शन)

"पोर्सिलेन आणि सिरॅमिक दोन्ही फरश्या विविध रंग, नक्षी(पॅटर्न) आणि फिनिशसह डिझाइन पर्यायांची विस्तृत श्रेणी प्रदान करतात. पोर्सिलेन फरश्यांमध्ये अधिक बारकाईचे डिझाइन असू शकतात, परंतु सिरॅमिक फरश्या वेगवेगळ्या सौंदर्यशास्त्रानुसार साजेसे पर्याय प्रदान करतात."

 

4. किंमत

पोर्सिलेन फरश्या त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमुळे आणि उच्च गुणवत्तेमुळे सिरॅमिकफरश्यांपेक्षा महाग असतात. सिरॅमिक फरश्या सामान्यत: सौंदर्यात्मक आकर्षण करत सोबतच  खिशाला परवडणार्‍या असतात 

 

एकंदरीत, पोर्सेलिन आणि सिरॅमिक फरश्या समान आहेत का? नाही, त्या नाहीत. पोर्सिलेन फरश्या अशा भागात उत्कृष्ट आहेत जेथे अनन्यसाधारण टिकाऊपणा आणि ओलाव्याचा प्रतिकार आवश्यक आहे, जसे की बाथरूम आणि स्वयंपाकघर. दुसरीकडे, सिरॅमिक फरश्या बहुतेक निवासी अनुप्रयोगांसाठी उपयुक्त असा एक अष्टपैलू आणि किफायतशीर पर्याय आहे. म्हणून हे ठरवताना की, पोर्सेलिन सिरॅमिकपेक्षा चांगले आहे का (किंवा उलट) आणि पोर्सेलिन विरुद्ध सिरॅमिक दरम्यान आपला अंतिम निर्णय घेताना आपण वरील घटकांचा विचार केला पाहिजे.



फ्लोअरिंग (तळ) आणि वॉल इन्स्टॉलेशनसाठी ते दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत हे लक्षात घेता, पोर्सिलेन विरुद्ध सिरॅमिक फरश्यांमधील निवड टिकाऊपणा, अष्टपैलूपणा आणि डिझाइन देऊ करण्याच्या आपल्या प्राधान्यांवर अवलंबून असते. पोर्सिलेन आणि सिरॅमिक फरक समजून घेतल्यानंतर, आपल्या प्रकल्पासाठी सर्वोत्तम निवड करण्यासाठी आपल्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्ये विचारात घ्या. आपल्याला फरश्यांशी संबंधित विषयांबद्दल , जसे की फरश्या उखडण्याची कारणे,अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, फरश्यांच्या उखडण्यावरील आमचा संबंधित ब्लॉग पहा.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....