संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj


प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग मधील फरक

बांधकाम किंवा नूतनीकरण प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणासाठीही प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग मधीलफरक समजून घेणे आवश्यक आहे. या दोन आवश्यक बांधकाम तंत्रांमधील फरक जाणून घ्या

Share:


बांधकामाच्या जगात, प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग ही दोन महत्त्वपूर्ण तंत्रे एखाद्या वास्तूचा टिकाऊपणा आणि देखावा सुधारण्यासाठी वापरली जातात. जरी ते प्रथम दर्शनी समान वाटत असले तरी या पद्धती वेगवेगळ्या हेतूंची पूर्तता करतात आणि त्यांना अंमलात आणण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यांची आवश्यकता असते. या ब्लॉगमध्ये, आपण त्यांच्या वैयक्तिक व्याख्या, हेतू आणि त्यांना वेगळे करणार्‍या फरकांमध्ये खोलवर जाऊया. प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग मधील फरक समजून घेऊन, आपण आपल्या बांधकाम प्रकल्पासाठी कोणते तंत्र सर्वात योग्य आहे याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अधिक सुसज्ज असाल.


प्लास्टरिंग म्हणजे काय?



भिंतीला प्लास्टरिंग कसा करावा हे समजण्यापूर्वी, तो नेमका काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. प्लास्टरिंग म्हणजे भिंती, छत किंवा आडभिंतीच्या पृष्ठभागावर प्लास्टरिंग नावाच्या मिश्रणाचा गुळगुळीत, समान थर लावण्याची प्रक्रिया. या मिश्रणात सामान्यत: सिमेंट, वाळू आणि पाणी असते, यद्यपि कार्यसुलभता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी चुना किंवा जिप्सम सारखे अतिरिक्त घटक मिश्रित केले जाऊ शकतात. प्लास्टरिंगचा प्राथमिक हेतू संरक्षक आवरण प्रदान करणे, संरचनेचा टिकाऊपणा आणि देखावा वाढविणे असा आहे. प्लास्टरिंग एक गुळगुळीत, समस्तरीय पृष्ठभाग तयार करण्यास देखील मदत करतो, जो  रंगकाम किंवा इतर सजावटीच्या अंत्यरूपणसाठी आदर्श असतो.

 

 

पॉईंटिंग म्हणजे काय?



दुसरीकडे, पॉईंटिंग ही, गवंडीकामाच्या बांधकामात विटा किंवा दगडांमधील उघड्या खाचा भरून देखावा देण्याची प्रक्रिया. या तंत्रामध्ये खाचांना बंधन मिश्रणाने(मोर्टार) भरणे समाविष्ट आहे, जे बर्‍याचदा प्लास्टरिंग प्रमाणेच सिमेंट, वाळू आणि पाण्याचे बनलेले असते. बांधकामात दर्जा भरण्याचा प्राथमिक हेतू पाण्याचा शिरकाव रोखणे आणि इमारतीची संरचनात्मक अखंडता वाढविणे हा आहे. हे एकंदर दिखाव्यास देखील हातभार लावते, वैयक्तिक एककांवर प्रकाशझोत टाकते आणि भिंतींना नीटनेटके आणि परिपूर्ण रूप देते.


प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग मधील फरक

प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग मधील फरक समजून घेत असतांना, आपल्याला काही मुख्य फरक समजून घेणे आवश्यक आहे:

 

1) अनुप्रयोग

प्लास्टरिंग संपूर्ण पृष्ठभागावर लावला जातो, ज्याद्वारे भिंती आणि छत झाकले जातात, तो एक गुळगुळीत आणि सातत्यपूर्ण अंत्यरुपण प्रदान करतो. दुसरीकडे, विटा किंवा दगड यासारख्या वैयक्तिक एककांमधील खाचांवर विशेषत: पॉईंटिंग केले जाते.

 

2) कार्य

प्लास्टरिंग प्रामुख्याने पृष्ठभागाचा देखावा वाढविण्यावर आणि बाह्य घटकांपासून संरक्षण प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तो एक शोभेचे आणि कार्यात्मक आवरण तयार करतो. याउलट, पॉईंटिंग हे संरचनात्मक मजबुतीकरण म्हणून कार्य करते, पाण्याची अंतर्गमन रोखते आणि गवंडीकामाच्या रचनांचे स्थैर्य राखते.

 

3) सामग्री

प्लास्टरिंगमध्ये सामान्यत: सिमेंट, वाळू आणि पाण्याचे मिश्रण वापरले जाते, तर  पॉईंटिंग मध्ये प्रामुख्याने बंधन मिश्रणाचा(मोर्टार) वापर केला जातो. प्रकल्पाच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार सामग्रीची निवडीमध्ये बदल हौ शकतो.

 

4) साधने आणि तंत्रे

प्लास्टरिंगचा समान प्रसार करण्यासाठी आणि इच्छित पोत प्राप्त करण्यासाठी प्लास्टरिंग देतांना थापी, घरंगळ आणि इतर साधनांचा वापर केला जातो. घटकांमधील पोकळी अचूकपणे भरून काढण्यासाठी पॉईंटिंग मध्ये थापी आणि जोडक सारख्या विशेष दर्जा भरणी साधनांची आवश्यकता असते.

 

5) कामाची व्याप्ती

प्लास्टरिंगमध्ये संपूर्ण भिंती किंवा छत यासारख्या मोठ्या क्षेत्राला आच्छादित करणे समाविष्ट असते, ज्यासाठी विस्तृत अनुप्रयोग आणि अधिक प्रशस्त पृष्ठभागाची तयारी आवश्यक असते. दुसरीकडे, दर्जा भरणी सामान्यत: लहान भागांवर केले जाते, विशेषत: वैयक्तिक घटकांमधील खाचांवर लक्ष केंद्रित करून.

 

6) वेळ आणि खर्च

मोठ्या पृष्ठभागाच्या क्षेत्रामुळे प्लास्टरिंगसाठी सहसा अधिक वेळ आणि परिश्रमाची आवश्यकता असते. यात प्लास्टरिंग फळी बसविणे आणि प्राथमिक थराचा अनुप्रयोग यासारख्या अतिरिक्त टप्प्यांचा देखील समावेश असू शकतो.  पॉईंटिंग, स्थानिक प्रक्रिया असल्याने, सामान्यत: जलद आणि अधिक किफायतशीर असते.

 

7) दृश्य प्रभाव

प्लास्टरिंग इमारतीच्या सर्वांगीण सौंदर्यात महत्त्वपूर्ण योगदान देतो, गुळगुळीत आणि परिपूर्ण देखावा प्रदान देतो. तो पोतदार किंवा पॉलिश केलेल्या पृष्ठभागांसारख्या विविध सजावटीचे अंत्यरुपण देणे शक्य करतो. पॉईंटिंग, दृष्टीस कमी ठळक असले तरी, वैयक्तिक घटकांवर प्रकाश टाकून आणि स्वच्छ, नीटनेटके जोड तयार करून गवंडीकामाच्या रचनांचे स्वरूप आणि आकर्षण वाढवते.

 

8) देखभाल

पृष्ठभाग चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी प्लास्टरिंगसाठी वेळोवेळी देखभालीची आवश्यकता भासू शकते, जसे की पुन्हा रंगकाम करणे किंवा ठिगळकाम.पॉईंटिंग, एकदा योग्यरित्या केल्यावर, त्याला सामान्यत: कमीतकमी देखभालीची आवश्यकता असते, कारण त्याचे प्राथमिक कार्य जोडांचे संरक्षण करणे आणि गवंडीकामाची संरचनात्मक अखंडता राखणे असते.



निष्कर्ष अंती, प्लास्टरिंग आणि पॉईंटिंग हे दोन्ही बांधकाम प्रक्रियेत आवश्यक भूमिका बजावतात. आपण घरमालक असणार, कंत्राटदार असणार किंवा वास्तुविशारद, आपल्याला आपल्या बांधकाम प्रकल्पांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्लास्टरिंग देणे आणि पॉईंटिंग यातील फरक ओळखता येणे आवश्यक आहे. जर आपल्याला प्लास्टरिंग बद्दल अधिक माहिती आणि आपल्या घरासाठी ते योग्य मार्गाने कसे करावे याबद्दल जाणून घेण्यात स्वारस्य असेल तर हा उपयुक्त व्हिडिओ पहा: आपल्या घराला प्लास्टरिंग देण्याचा योग्य मार्ग. हा व्हिडिओ व्यावसायिक प्लास्टरिंग परिणाम प्राप्त करण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि चरण-दर-चरण मार्गदर्शन प्रदान करतो.



संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ





घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....