ही ग्राहकांसाठीची एक मूल्य वर्धित सेवा आहे, जी मोफत येते, या सेवेचा उद्देश कॉंक्रीटीकरणादरम्यान तांत्रिक सहाय्य पुरवणे आहे यामुळे कॉंक्रीटचा दर्जा व सातत्यतेची हमी मिळते. साइटवर पात्र आणि प्रशिक्षित सिव्हिल इंजिनीअरद्वारे सज्ज असलेल्या व्हॅनद्वारे ही सेवा पुरविली जाते. व्हॅनमध्ये साइटवरील सामुग्रीच्या परीक्षणासाठी आवश्यक चाचणी सुविधा / उपकरणे असतात. बांधकामात वापरल्या जाणा-या कच्च्या मालाचे साइटवर परीक्षण केले जाते आणि दर्जेदार कॉंक्रीट तयार करण्याच्या योग्य पद्धतींवर ग्राहकांना सल्ला दिला / मदत केली जाते. सामर्थ्य व टिकाऊपणाशी तडतोज न करता अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी ग्राहकांना कॉंक्रीट मिक्स डिझाइन्स (सिमेंट, वाळू, धातू आणि पाण्याचे गुणोत्त्तर) पुरवण्यात येतात. दर्जा शाश्वती म्हणून, साइटवरील कॉंक्रिटची त्याच्या कॉंप्रेसिव्ह दृढतेसाठी चाचणी केली जाते आणि ग्राहकांना चाचणी अहवाल दिला जातो. फील्ड डेमोद्वारे ग्राहकांना कव्हर ब्लॉक्स आणि मास्किंग टेप वापरण्याचे महत्व सांगितले जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्व ग्राहकांना आम्हाला 1800 210 3311 (टोल फ्री) वर कॉल करावा लागेल.
This website uses cookies to serve content relevant for you and to improve your overall website
experience.
By continuing to visit this site, you agree to our use of cookies.
Accept
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
अल्ट्राटेक हे भारताचे नंबर 1 सिमेंट आहे - माहिती
Address
"B" Wing, 2nd floor, Ahura Center Mahakali Caves Road Andheri (East) Mumbai 400 093, India
© 2020सर्व हक्क आरक्षित, अल्ट्राटेक सिमेंट लि.