तुमच्या घराला आर्किटेक्ट व इंजिनिअर दोघांचीही आवश्यकता का असते?

25 ऑगस्ट, 2020

जरी आर्किटेक्ट व इंजिनिअर्सच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी दोघांचे तुमच्या घराच्या निर्माणाच्या नियोजन व पर्यवेक्षण टप्प्यात एकसारखे महत्व असते. चला तर ते का महत्वाचे आहेत हे या तक्त्याने समजून घेऊया.

आर्किटेक्टची भूमिका

  • आर्किटेक्टवर तुमच्या घराच्या एकंदरीत ढाच्याचे आणि सुबकतेचे डिझाइन करण्याची जबाबदारी असते.
  • ते तुमच्या नवीन घरासाठी तुमच्याकडून कल्पना, ध्येये आणि भविष्यातल्या आवश्यकता जाणून घेऊन त्यानुसार प्रभावी ब्लूप्रिंट तयार करू शकतात.
  • आर्किटेक्टना केवळ व्यावसायिक डिझायनिंगची पार्श्वभूमी नसते, तर ते या क्षेत्रातील बिल्डिंग कोड आणि नियमांशीही मोठ्या प्रमाणात परिचित असतात.

इंजिनिअरची भूमिका

  • शास्त्रोक्त पार्श्वभूमीसोबत, इंजिनिअर तुमच्या आर्किटेक्टसोबत काम करुन तुमचे घर संरचनात्मक दृष्टीने सुरक्षित असण्याची खात्री करेल.
  • त्यांना विविध तांत्रिक बाबी, संरचनात्मक भाराच्या मर्यादा आणि सामग्रीच्या आवश्यकतांची माहिती असल्यामुळे ते तुम्हाला त्याप्रमाणे नियोजन करायला मदत करु शकतात.
  • इंजिनिअर्स इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी आणि घराच्या प्लंबिंग आराखड्यासाठी (लेआऊट) देखील जबाबदार असतात.

तुमच्या टीममध्ये आर्किटेक्ट व इंजिनिअर दोन्ही असण्यामुळे तुमच्या घराचे बांधकाम सुंदर व सुरक्षितपणे होण्याची खात्री होऊ शकेल. तुमच्या गृह निर्माण टीमची निवड करताना त्यांचे महत्व नक्की लक्षात ठेवा.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा