First slide [800x400] First slide [800x400]

घराच्या बांधकामामध्ये बजेटच्याअ आश्चर्यांना टाळायचे आहे का?

तुमच्या आयुष्यातल्या बचतीचा मोठा भाग तुम्ही खर्च करत असल्यामुळे सुरुवातीलाच तुमचे नियोजन योग्य आहे का नाही हे महत्वाचे आहे कारण बांधकामाच्या आधीचे नियोजन बरीच बचत करण्यात मदत करते.

तुमच्या खर्चाचा बराचसा भाग जमीन खरेदीवर खर्च केला जाईल. सामुग्री खरेदी आणि मजूरांचा खर्च दुस-या स्थानावर असतो. सामुग्रीच्या खर्चाचे मजूरीच्या खर्चाशी असलेले मानक गुणोत्तर 65:35 आहे.

अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, इथे 1000चौ.फुट घराच्या निर्माणाच्या टप्प्यांसाठी अंदाजे खर्च देण्यात आला आहे.

बांधकामाचे टप्पे आणि एकुण खर्चाची टक्केवारी

3%

सर्वसामान्य जमीनीचे उत्खनन आणि कॉंक्रीट्फाउंडेशन

5%

ब्रिकवर्क/स्टोन वर्क-प्लिंथपर्यंत

25%

ब्रिकवर्कमधले सूपरस्ट्रक्चर

20%

वॉटरप्रुप्रिंगचा आंतर्भाव करत केलेले रुफिंग

6%

फ्लोरींग

15%

लाकडीकाम म्हणजेच जॉइनरी, दारे आणि खिडक्या आंतर्गत फिनिश

6%

आंतर्गत फिनिश

3%

बाह्य फिनिश

4%

पाणी पुरवठा

8%

सॅनिटरी कामकाज

5%

इलेक्ट्रिफिकेशन

बांधकाम सुरु करण्याआधी तुमच्याकडे गलेलठ्ठ रक्कम असणे गरजचे नाही. तुमच्या कॅश फ्लोला प्रत्येक टप्प्याप्रमाणे समायोजित करा, ज्यामुळे तुम्हाला काम संपण्याआधी बजेटच्या पलिकडे जाणे पहावे लागणार नाही.

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...