संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा

घरासाठी वास्तुशास्त्रविषयक उपयुक्त सूचना

घरासाठी वास्तूविषयक उपयुक्त सूचनांमुळे तुमच्या कुटुंबात उत्तम भवितव्य, आनंद आणि यश येण्यास मदत होते.


घरात आनंद आणि यश येण्यासाठी वास्तूविषयक ह्या सोप्या उपयुक्त सूचनांचे पालन करा.

तुम्ही जर नवीन घरात रहायला जात असाल आणि त्याची सजावट तुम्ही स्वत:च किंवा अंतर्गत सजावटकाराकडून करून घेणार असलात, तर तुम्ही घरासाठी नेहमीच वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा हे बरे. घरासाठीचे वास्तुशास्त्र हे शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे आणि त्यात रचनेची, वास्तुरचनेची आणि नकाशाची तत्त्वे वर्णन केलेली आहेत. घरातून सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहावी म्हणून घरासाठी वास्तुविषयक उपयुक्त सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.

सकारात्मकता आणि चांगल्या भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी वास्तू विज्ञान आणि आपल्या घरांच्या डिझाइनमधील संबंध समजून घेणे अत्यावश्यक आहे. घरासाठी विविध वास्तु टिप्स आहेत ज्या तुमच्या घरात समाविष्ट केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे जीवन प्रेम आणि आनंदाने भरलेले असेल. येथे काही पैलू दिले आहेत :

घर बांधण्यासाठी जागेची निवड :

Selection of plot according to vastu

घर बांधण्यासाठी जागेची निवड :

  • घरासाठी वास्तूची दिशा घराच्या सकारात्मकतेच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही जर राहत्या घरासाठी भूखंडाची निवड करीत असलात, तर भूखंडाच्या वास्तूचे नियम पाळून त्यानुसार गोष्टी पुढे नेणे अधिक चांगले. घराची दिशा, मातीचा प्रकार, भूखंडाचा आकार आणि आणखी बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

विधी शूल :

विधी शूल म्हणजे अशी स्थिती जेव्हा भूखंडाला रस्ता लागून जातो. काही विधी शूल सकारात्मकता घेऊन येतात आणि काही शूल नकारात्मकता घेऊन येतात. उत्तरेच्या ईशान्येला, पूर्वेच्या ईशान्येला असलेले विधी शूल सर्वोत्तम समजले जातात, तर दक्षिणेच्या आग्नेयला, पश्चिमेच्या नैर्ऋत्येला असलेले विधीशूल मर्यादित समजले जातात.

पाण्याचे स्रोत :

Planning of water resources according to vastu

पाण्याचे स्रोत :

  • घराच्या वास्तूचा विचार करताना पाण्याचे स्रोत ही आणखी एक बाब विचारात घेण्यासारखी आहे. टाक्या, विहिरी किंवा इतर कोणतेही पाण्याचे स्रोत यांच्यासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम असते. घरामध्ये उत्तरेकडील दिशा पवित्र समजली जाते आणि म्हणून ती मोकळी ठेवलीच पाहिजे. या मोकळ्या जागेत पाण्याच्या टाक्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सकारात्मक परिणाम होतो.

घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तू :

Main door position according to Vastu

घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तू :

  • घराचा मुख्य दरवाजा वास्तूच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा पैलू असतो, कारण ते घराचे प्रवेशद्वार असते. मुख्य दरवाजा नेहमीच उत्तरेकडे, पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेकडे असला पाहिजे. मुख्य दरवाजा उत्तम दर्जाच्या लाकडाने तयार केलेला असला पाहिजे. तो खूप मनमोहक दिसला पाहिजे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कोणत्याही प्रकारचे कारंजे किंवा इतर पाण्याचा उपयोग करून केलेल्या सजावटीच्या वस्तू ठेवणे टाळा.

दिवाणखाना :

Vastu Tips for Living room

दिवाणखाना :

  • दिवाणखाना ही अशी जागा असते, जेथे घरातील बहुतेक कामे केली जातात. तो तुमच्या घराविषयी प्रथम मत तयार करतो, म्हणून तेथे पसारा नसावा. त्याचे तोंड पूर्वेकडे, उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे असायला हवे. जड फर्निचर दिवाणखान्याच्या पश्चिमेकडे किंवा नैर्ऋत्येकडे ठेवावे.

मास्टर बेडरूम :

आदर्शपणे सांगायचे झाले, तर नर्ऋत्य दिशेला असलेल्या शयनगृहामुळे उत्तम आरोग्य आणि भरभराट प्राप्त होते. पलंग शयनगृहाच्या नर्ऋत्येच्या कोपऱ्यात ठेवावा. पलंगाच्या समोर आरसा किंवा टेलिव्हिजन ठेवणे टाळा.

मुलांची खोली / पाहुण्यांची खोली :

Children room as per vastu

मुलांची खोली / पाहुण्यांची खोली :

  • मुलांची खोली ईशान्य दिशेस असली पाहिजे, कारण त्यामुळे दर्जेदार बुद्धिमत्ता, ताकद आणि शक्ती प्राप्त होते. त्याच दिशेस पलंग ठेवल्यास त्यामुळे मुलांना सकारात्मकतेचा आशीर्वाद मिळण्याची खात्री होते.

स्वयंपाकघर :

Kitchen according to vastu

स्वयंपाकघर :

  • स्वयंपाकघरासाठी नैर्ऋत्य दिशा आदर्श समजली जाते. भिंतींसाठी पिवळा, गुलाबी, केशरी, लाल आणि काळा यांसारखे गडद रंग निवडा. स्टोव्ह (चूल) नैर्ऋत्य दिशेस ठेवण्याची काळजी घ्या.

भोजनकक्ष :

Dining room as per vastu

भोजनकक्ष :

  • आदर्शपणे सांगायचे झाले तर, आपण पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेस तोंड करून भोजन केले पाहिजे. नियमितपणे दक्षिण दिशेस तोंड करून भोजन केल्याने समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. डायनिंग टेबलाचा आकार चौरस किंवा आयताकृती असायला हवा; तो गोल किंवा इतर अनियमित आकाराचा नसावा.

पूजेची खोली :

Pooja room as per vastu

पूजेची खोली :

  • प्रार्थनेच्या खोलीसाठी पूर्व किंवा ईशान्य दिशा अगदी योग्य असते. पवित्र वेदी तयार करून तिला मेणबत्या किंवा उदबत्त्यांनी सजवा. भिंतींसाठी पांढरा, बीज, फिकट पिवळा किंवा हिरवा रंग हे उत्तम पर्याय आहेत.

स्नानगृह / प्रसाधनगृह :

Bathroom as per vastu

स्नानगृह / प्रसाधनगृह :

  • वॉशबेसिन आणि शॉवर हे वास्तूनुसार तुमच्या बाथरूमचा भाग म्हणून पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेस असावेत. स्नानगृहातील व प्रसाधनगृहातील पाणी आणि सांडपाणी बाहेर जाण्यासाठीची योग्य दिशा म्हणजे उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशा होय.

बाल्कन्या :

Balcony as per vastu

बाल्कन्या :

  • बाल्कन्या ह्या घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेस तयार केलेल्या असाव्यात. नैर्ऋत्य किंवा दक्षिण दिशेस बाल्कन्या बांधणे टाळावे.

तुमचे घर आनंद, यश आणि उत्तम आरोग्य यांनी भरलेले राहण्यासाठी वास्तूसंबंधीच्या ह्या उपयुक्त सूचना अमलात आणण्याची काळजी घ्या.