बांधकामाच्या विविध टप्प्यांना/स्थितींना समजून घेणे

March 27, 2019

बांधकामाच्या अनेक स्थितींची उत्तम संकल्पना मिळवणे नियोजन टप्प्यातली सर्वात महत्वाची बाब आहे. या टप्प्यांना विचारात घेतल्यामुळे घर निर्मात्याला घर व वित्ताचे अधिक चांगल्याप्रकारे नियोजन करणे शक्य होते.

व्यक्तीगत घर निर्मार्त्याने बांधकामाच्या या तीन मुख्य टप्पांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे: नियोजन, बांधकाम आणि फिनिशिंग

नियोजन: या टप्प्यात जरी बांधकाम होत नसले तरी काय निवड करावी हे ठरवल्यामुळे तुमचे बजेट ठरते, उत्पादन डिलिवरीची टाइमलाइन आणि तुमच्या घराचा एकंदरी लुक/स्वरुप ठरते. नियोजनात हे समाविष्ट असते:

•    बजेट ठरवणे

•    दस्तऐवजीकरण

•    बांधकाम पूर्ण करण्यासाठी भूभाग निवडणे

•    तुमची टिम निवडणे – कंत्राटदार, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, मजूर (जर तुम्ही कंत्राटदार नियुक्त करत नसाल तर)

बांधकाम: या टप्प्यात, तुमचे घर आकारण्यास सुरुवात होते. पहिले काम म्हणजे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य मिळवणे उदा. सिमेंट, वाळू, विटा, पाणी, खडी सामुग्री मिळवल्यावर तुमची टिम:

•    पाया/जोते टाकेल

•   तुमचे फ्रेमवर्क तयार करेल

•   विविध मिक्सेस तयार करेल

•   वॉटरप्रुफिंग

•   भिंतींचे प्लास्टरींग करेल

•   प्लंबिंग

•   वायरींग केले जाईल

फिनिशिंग: या टप्प्यात, घराच्या सुशोभिकरणावर भर दिला जाईल आणि या टप्प्यात इंटिरियर अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावते. तुमची टिम रुफिंग, फ्लोअरींग, पेंटिंग आणि तुमच्या बाथरुम, किचन, वॉश बेसिन्समधल्या फिटिंग्जचे पर्यवेक्षण करेल.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा