सुरक्षा सर्वप्रथम- ऑन-साईट सुरक्षिततेचे मार्गदर्शन

25 मार्च, 2019

घर बांधकामाच्या प्रक्रियेदरम्यान, स्थळावरच्या कामगारांच्या हिताकडे लक्ष देणे ही तुमची जबाबदारी आहे. सुरुवात करण्याआधी, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली पाहिजे आणि कोणतीही समस्या असल्यास तिचे निराकरण केले पाहिजे.

जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तीगत सामर्थ्यानुसार स्थळाचे निरीक्षण करता तेव्हा याची शाश्वती करा:

•    स्थळावर प्रथमोपचार किट आहे

•    ब्रिक आणि ब्लॉक मेसन्सकडे हार्ड-हॅट आणि गॉगल आहेत

•    सर्व कामगारांनी नॉन-स्किड वर्क बूट घातले आहेत

•   अनुभवी व्यक्ती स्कॅफोल्डिंगचे काम करत आहे

•    वापराआधी शिड्यांना वरच्या आणि खालच्या बाजूला बांधले पाहिजे

•    शिफ्टच्या शेवटी, स्थळावरुन कोणत्याही धारदार वस्तू आणि विद्युत उपकरणे काढून टाकावीत.

•    सर्व केमिकल कंटेनरवर रासायनिक धोक्याचे चिन्ह असले पाहिजे.

•    दररोज सुरुवात करताना कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षेच्या संदर्भात माहिती दिली पाहिजे

हवामानाच्या परिस्थितीनुसार, कामगार योग्य प्रकारे हायड्रेटेड राहण्याची खात्री करा. एखादा कामगार आरोग्याबद्दल तक्रार करत असल्यास, तुम्ही लगेच कॉन्ट्रॅक्टरसोबत चर्चा केली पाहिजे

एक जबाबदार बिल्डर म्हणून आणि तुमच्या बांधकाम स्थळावर उच्च सुरक्षा मानके कायम राखण्याने तुम्ही सर्व कामगारांसाठी किमान जोखमी येतील व प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याची शाश्वती देता.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा