तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
ज्यांनी सिमेंट ते काँक्रीटची काँप्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथ इथपर्यंत नूतनीकरणाच्या कामात मनापासून स्वारस्य घेतलेले आहे त्यांच्यापैकी जर तुम्ही एक असलात आणि घराचे रंगकामही करवून घ्यायचे असेल, तर आम्ही घराच्या रंगकामाविषयी काही उपयुक्त सूचना तुमच्यासाठी देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला योग्य रंग निवडता येईल आणि तुमचा रंगही दीर्घकाळपर्यंत टिकेल. घराच्या रंगकामाविषयीची ही मार्गदर्शिका तुम्हाला पेंटिंगविषयीच्या उपयुक्त सूचनांपासून ते भिंती रंगवण्याच्या तंत्रापर्यंत प्रत्येक गोष्ट सामावून घेईल. चला तर मग, सुरुवात करू या!
रंगकामाविषयीच्या ह्या उपयुक्त सूचनांमुळे तुम्ही जर स्वत:च संपूर्ण रंगकामाची प्रक्रिया करण्यासाठी प्रेरित झालेले असलात, तर रंगकाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा लेख वाचावा असे सुचवतो :
https://www.ultratechcement.com/home-building-explained-single/how-to-choose-the-right-exterior-paint-colours-for-your-home
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. आपण जुन्या रंगावर पुन्हा थेट रंग लावू शकतो का ?
जुना रंग आणि नवीन रंग रासायनिकदृष्ट्या जर सारखेच (उदाहरणार्थ, ऑईल-बेस्ड) असतील, तर तुम्हाला शक्यतो प्रायमर लावण्याची गरज भासणार नाही. जर सध्याची भिंत गुळगुळीत आणि स्वच्छ असेल, तर तुम्ही जुन्या रंगावर नवीन रंग थेट लावू शकता.
2. तुम्ही रंगाचे कमीतकमी किती थर लावले पाहिजेत ?
रंगाचे कमीतकमी दोन थर लावले पाहिजेत असा मूळ नियम आहे. परंतु भिंतीसाठी वापरलेले साहित्य आणि आधीचा रंग हे या संख्येमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, फिनिशिंग न केलेल्या कोरड्या भिंतीसाठी तुम्हाला प्रायमर किंवा अंडरकोट पेंटची ही गरज भासू शकते.
3. भिंतीला रंग लावण्यापूर्वी प्रायमर लावला नाही, तर काय होईल ?
तुम्ही जर प्रायमर टाळला, तर तुमच्या रंगाचे पोपडे निघण्याची दाट शक्यता असते, विशेषत: दमट हवामानात. शिवाय, रंगाची चिकटून राहण्याची क्षमता नसेल, तर त्यामुळे रंग लावल्यानंतर काही महिन्यांनी साफ करणे अधिक अवघड होऊ शकते. तुम्ही जर धूळ किंवा बोटांचे ठसे पुसून काढण्याचा प्रयत्न केला, तर रंग निघून जाऊ शकतो.