25 मार्च, 2019
तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडून उत्तरदायित्वाची शाश्वती घेण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे त्याला करारावर स्वाक्षरी करण्यास सांगणे. जर कॉन्ट्रॅक्टर त्याच्या टाईमलाईनवर टिकून राहिला आणि त्याने वेळेवर डिलिवरी केली, तर तुमचे बजेट शाबूत राहील. शिवाय, यामुळे भविष्यात कोणतेही वाद टाळण्यास मदत होईल.
कराराचा दस्तऐवज तयार करण्यापूर्वी, स्वत: चे घर बांधलेल्या तुमच्या नातेवाईकांशी, ओळखीच्या लोकांशी आणि शेजाऱ्यांशी बोला. ते कॉन्ट्रॅक्टरसोबत उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर प्रकाश पाडू शकतात. तुमच्या करारामध्ये हे समाविष्ट असण्याची खात्री करा:
• कॉस्ट ऑफ सर्विस म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे शुल्क आणि कामगार खर्च
• श्रम आणि कालमर्यादा निश्चिती
• बांधकाम पूर्ण होण्याची तारीख
• अनपेक्षित गरजांसाठी तरतुद केलेली रक्कम
शक्य असल्यास तुमचे दस्तऐवज तपासण्यासाठी कायदेतज्ज्ञ मिळवा आणि मगच स्वाक्षरी करा. कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही दोघांनीही स्वाक्षरी केल्यानंतर कृपया कराराला नोटराईज करा
This website uses cookies to serve content relevant for you and to improve your overall website
experience.
By continuing to visit this site, you agree to our use of cookies.
Accept
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
आम्हाला याची कल्पना आहे की काही लोक जनतेला कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशीप आणि रिटेल आउटलेट डिलरशीप आणि मोठ्या प्रमाणावर/उत्पादनांची उच्च सवलतीच्या दरात विक्री करण्याचे आमिष दाखवतात आणि प्रक्रियेमध्ये आगाऊ रक्कम मागतात. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (यूटीसीएल)च्या नावाचा व लोगोचा ते अवैधपणे उपयोग करतात आणि स्वत:ला यूटीसीएलचे अधिकृत प्रतिनिधी म्हणवून घेतात.
कृपया याची नोंद घ्या की, यूटीसीएल एसएमएस, व्हॉट्सऍप मेसेज, कॉल्स, ईमेल्सद्वारे किंवा सोशल मीडिया मार्फत कधीही आपल्या मालाची विक्री करत नाही आणि कधीही ग्राहकांकडून त्यासाठी नेट बॅकिंग किंवा इतर माध्यमाने आगाऊ रकमेची मागणी करत नाही.
कृपया अशा लोकांवर विश्वास ठेवू नका आणि जर तुमच्याशी कोणी अल्ट्राटेकची उत्पादने देण्यासाठी कोणत्याही माध्यमाने संपर्क साधला, त्यांच्या बॅंक खात्यात अग्रिम रक्कम जमा करण्याची मागणी केली तर कृपया या घटनेची जवळच्या डिलरकडे किंवा अधिकृत रिटेल स्टॉकिस्टकडे सूचना द्या किंवा कंपनीच्या 1800 210 3311 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.
कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा साहाय्यासाठी, कृपया आमचा 1800 210 3311 टोल फ्री क्रमांक डायल करा किंवा आमच्या www.ultratechcement.com अधिकृत वेबसाइटला भेट द्या
अल्ट्राटेक हे भारताचे नंबर 1 सिमेंट आहे - माहिती
Address
"B" Wing, 2nd floor, Ahura Center Mahakali Caves Road Andheri (East) Mumbai 400 093, India
© 2020सर्व हक्क आरक्षित, अल्ट्राटेक सिमेंट लि.