तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
जेव्हा आपण राहण्यासाठी किंवा व्यवसायासाठी म्हणून भूखंडाची निवड करीत असतो, तेव्हा वास्तूनुसार जमिनीची निवड करणे महत्त्वाचे असते. कारण भूखंड हा स्थिर असतो आणि तो हलवता येत नाही, म्हणून तेथे सकारात्मक लहरी याव्यात आणि नकारात्मक ऊर्जेच्या लहरी दूर जाव्यात असे तुम्हाला वाटत असते. भूखंडाचे वास्तुशास्त्र हे घराच्या वास्तुशास्त्रापेक्षा वेगळे असते. म्हणून तुम्हाला योग्य भूखंड मिळेल की नाही अशी चिंता जर तुम्हाला वाटत असेल, तर हे वाचून तुम्हाला प्रत्येक गोष्ट तपशीलवार समजेल.
सर्वात पहिले म्हणजे भूखंड खरेदी करण्यापूर्वी वास्तूसंबंधी ज्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे, त्या समजून घ्या. ह्या भागात लक्षात ठेवण्यासारख्या तीन महत्त्वाच्या उपयुक्त सूचना आहेत :
तुमच्या भूखंडाची जमीन शांततापूर्ण, शांत असली पाहिजे आणि सकारात्मकता उत्सर्जित करण्यासाठी तिच्याभोवती भरपूर हिरवीगार वनराई असली पाहिजे. सुपीक माती हे भूखंडाभोवतीची माती चांगली असल्याचे लक्षण आहे. भूखंडाच्या वास्तूसंबंधी अधिक माहिती मिळविण्यापूर्वी जमिनीवर उभे राहून तिच्यातील कंपने अनुभवणे उत्तम असते. तुम्ही तेथे असताना तुम्हाला सकारात्मक वाटलेच पाहिजे. कोणत्याही प्रकारचे वाईट किंवा नकारात्मक विचार दूर केले पाहिजेत.
वास्तूनुसार भूखंड निवडण्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक पैलू म्हणजे त्या जागेची अभिमुखता. वास्तूविषयक मार्गदर्शक सूचना ह्या शास्त्रीय कार्यकारण भाव आणि तर्कशास्त्रावर आधारित आहेत. कोणत्याही शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे/अपार्टमेंट्स असतात आणि जेव्हा चारही बाजूंना घरे असतात तेव्हा शहर अधिक सुंदर दिसते. म्हणून भूखंडाच्या वास्तूनुसार, सर्व दिशा चांगल्या असतात असे मानले जाते. विद्वान, पुरोहित, तत्वज्ञ, प्राध्यापक यांच्यासाठी पूर्वाभिमुख भूखंड चांगला असतो, सत्तेवरील व्यक्ती, प्रशासक यांच्यासाठी उत्तराभिमुख चांगला असतो, व्यावसायिकांसाठी तसेच जे व्यवस्थापकीय पातळीवर काम करतात त्यांच्यासाठी दक्षिणाभिमुख, तर जे समाजाला सपोर्टिंग सेवा पुरवतात त्यांच्यासाठी पश्चिम अभिमुख भूखंड चांगला असतो.
घराच्या बांधकामाचे वेगवेगळे टप्पे सुरू करण्यापूर्वी त्याआधी ती जमीन कशासाठी वापरली जात होती हे तपासून पाहणे महत्त्वाचे असते. जो भूखंड लागवडीसाठी योग्य असेल त्याची निवड करणे चांगले असते, कारण ती सर्वाधिक सुपीक माती असते. सर्वसाधारणपणे, जी जमीन लागवडीसाठी चांगली असते, ती इमारतीच्या पायासाठीही उत्तम असते. काळी माती लागवडीसाठी तसेच इमारतीसाठीही चांगली नसते, कारण ती पाणी धरून ठेवते आणि त्यामुळे पाया दमट राहतो. त्याशिवाय बांधकामासाठी खडकाळ जमीनही टाळा. भरपूर किडे-कीटक असलेली जमीनही टाळावी, कारण त्यातून हे दिसते की, माती खूप ढिली आहे.
पुढचा टप्पा असतो तो भूखंडाच्या सभोवतालच्या रस्त्यांचा विचार करण्याचा. खाली काही निदर्शक देत आहोत :
चांगली जागा :
सरासरी जागा :
वाईट जागा :
भूखंडाच्या वास्तूचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निवडलेल्या भूखंडाचा किंवा जमिनीचा आकार. खाली दिलेले चार आकार सर्वाधिक आढळतात :
आयताकृती भूखंड : वास्तूनुसार लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर १:२ असलेला भूखंड निवडीसाठी चांगला असतो. जर लांबी उत्तराभिमुख असेल आणि रुंदी पश्चिम अभिमुख असेल, तर तो सर्वाधिक योग्य समजला जातो. अशा भूखंडांमुळे उत्तम आरोग्य, संपती आणि भरभराट प्राप्त होते.
त्रिकोणी भूखंड : त्रिकोणाकृती भूखंड घराच्या बांधकामासाठी चांगला नसतो असे समजले जाते. वास्तूनुसार अशा प्रकारच्या जागा आगीला आणि हानीला बळी पडू शकतात.
अंडाकृती भूखंड : अशा प्रकारचे भूखंड घराच्या बांधकामासाठी चांगले समजले जात नाहीत. वास्तूनुसार अशा भूखंडांमुळे मालकांसाठी दुर्दैव पदरी येईल.
आपण वास्तूनुसार भूखंडाची निवड करण्यापूर्वी त्याच्या एकसमानतेचीही नोंद घेतली पाहिजे :
तुम्ही जर राहण्यासाठी भूखंडाच्या वास्तूकडे बघत असलात, तर तो जमिनीचा सपाट तुकडा असल्याची खातरजमा करा. भूखंडावर जर उतार असेल, तर तो उतार जर नैर्ऋत्येकडे किंवा ईशान्येकडे असेल तर तो कल्याणकारी समजला जातो. उतार जर पश्चिमेकडे असेल, तर त्यामुळे कुटुंबाच्या सदस्यांमध्ये विजोडपणा येतो आणि त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
भूखंडाला यशासाठी आणि आनंदासाठी आशीर्वाद लाभावा म्हणून या होत्या काही वास्तूविषयक उपयुक्त सूचना. भूखंड खरेदी करण्यापूर्वी किंवा वास्तूनुसार जमीन निवडण्यापूर्वी ह्या मनात ठेवा. तुम्ही घर बांधण्यासाठी खर्चाचा हिशेब करून वास्तूनुसार भूखंड निवडण्यापूर्वी भूखंडाच्या कायदेशीर आवश्यकता समजून घेणे उत्तम असते. तुम्ही त्या आमच्या लेखात तपशीलवार समजून घेऊ शकता : https://www.ultratechcement.com/home-building-explained-single/5-must-have-documents-to-avoid-legal-hassles-later