तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
पूजेच्या खोलीनंतर स्वयंपाकघर ही घरातील सर्वात पवित्र जागा समजली जाते, कारण सकस अन्नघटकांची देवी माता अन्नपूर्णा येते राहते. आपण स्वयंपाकघरातच आपले दररोजचे जेवण बनवतो, असे जेवण जे आपल्याला दररोजची कामे करण्यासाठी शक्ती देते, आपली मूलभूत गरज असलेली भूक भागवते आणि आपल्याला निरोगी व तंदुरुस्त ठेवते.
योग्य किचन वास्तू प्लेसमेंटमुळे आजारांना आमंत्रण देणार्या नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवून सकारात्मक वातावरणासह निरोगी जीवनाची खात्री होते. वास्तूनुसार न बांधलेले स्वयंपाकघर आर्थिक भार, आजार, कौटुंबिक वाद इत्यादींना आमंत्रण देणारे आढळले आहे.
योग्य स्वयंपाकघरासाठी वास्तूविषयक उपयुक्त सूचनांमध्ये असे सुचविलेले आहे की, त्याचे प्रवेशद्वार पश्चिमेला किंवा दक्षिणेला असावे. स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करण्यासाठी ह्या पवित्र दिशा समजल्या जातात. ह्या दिशा जर उपलब्ध नसतील, तर आग्नेय दिशेचाही वापर केला जाऊ शकतो.
वास्तुस्नेही स्वयंपाकघर बांधण्यासाठी आणि सकरात्मक लहरी येऊन तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला वर उल्लेख केलेल्या सर्व उपयुक्त सूचना तुम्हाला माहीत असायला हव्यात.
पूजेची खोली ही घरातील आणखी एक पवित्र जागा असते आणि त्यासाठी सात्विकतेचे आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी खूप लक्ष द्यावे लागते. पूजा कक्षाच्या वास्तूबद्दल (Vastu for puja room) विषयी अधिक वाचा.