कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया, सुपर बिल्ट अप एरिया मधील फरक

भारतात तुमच्या घराचे क्षेत्र हे कार्पेट एरिया, बिल्ट अप एरिया आणि सुपर बिल्ट अप एरिया अशा प्रकारे मोजले जाऊ शकते. घर बांधणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्याकरिता हे शब्दप्रयोग समजून घेणे महत्त्वाचे असते.

1

 

 

 

1
 

 

कार्पेट एरिया म्हणजे जमिनीचे वापरण्याजोगे क्षेत्र, ज्याला एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत कार्पेटने झाकता येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला संभाव्य घराचे अचून चित्र प्राप्त होते. ह्याची मोजणी करण्यासाठी मालमत्तेतील प्रत्येक खोलीच्या एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत लांबी आणि रुंदीची बेरीज करा, ज्यात बाथरूम्स आणि पॅसेजवेज्‌चाही समावेश आहे. हे क्षेत्र बिल्ट अप एरियाच्या सरासरी ७०% असते.

2

 

 

 

2
 

 

बिल्ट-अप एरिया = कार्पेट एरिया + भिंतींनी व्यापलेले क्षेत्र. यात बाल्कन्या, टेरस (छतासह किंवा छताशिवाय), मेझॅनाईन फ्लोअर्स, इतर वेगळे करता येण्याजोगे राहण्याजोगे भाग (जसे सर्व्हंट्‌स रूम्स) यांसारख्या इतर क्षेत्रांचाही समावेश असतो. हे क्षेत्र कार्पेट एरियापेक्षा साधारणपणे १०-१५ टक्के अधिक असते.

3

 

 

 

3
 

 

सुपर बिल्ट अप एरिया = बिल्ट अप एरिया + त्या प्रमाणातील सामायिक क्षेत्र. ह्या मोजमापाला ‘सेलेबल एरिया’ असे्ही म्हटले जाते. अपार्टमेंटच्या बिल्ट-अप एरियाव्यतिरिक्त यात लॉबी, स्टेअर केस, शाफ्ट्‌स, आणि अगदी रिफ्यूज एरिया यांचाही समावेश असतो. यात कधीकधी स्वीमिंग पूल आणि जनरेटर रूम्स यांचाही समावेश असतो.

 

हे फरक समजून घेतल्यामुळे तुम्ही जो भूखंड खरेदी करण्याचा विचार करीत आहात त्या भूखंडाची तपासणी करून आता आत्मविश्वासाने किमतीत घासाघीस करू शकता.

घरबांधणीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ट्यून करा #बातघरकी... अल्ट्राटेककडून 

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा