तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सिमेंट निवडण्यासाठी तात्काळ मार्गदर्शन

25 मार्च, 2019

घराच्या बांधकामाच्या प्रक्रियेत बरेचदा अनेक टप्पे आंतर्भूत होतात आणि यापैकी बहुतांश टप्प्यांमध्ये, सिमेंटची निवड महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

घर बांधण्यासाठी सिमेंटचे तीन मुख्य प्रकार आहेत - OPC, PPC आणि PSC. या तिघांपैकी OPC जवळजवळ सर्वत्र उपलब्ध असल्याचे तुमच्या लक्षात येईल, परंतु PPC आणि PSC अधिक चांगली मजबूती आणि उत्कृष्ट टिकाऊपणा देतील.

सिमेंट खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची तारीख तपासा. सिमेंटची बॅग 90 दिवसांपेक्षा जास्त जुनी असेल तर तुम्ही तुमच्या इंजिनिअरशी बोलले पाहिजे. तुम्हाला उत्पादनाची तारीख, एमआरपी आणि आयएसआय स्टॅम्प सारखी इतर महत्वपूर्ण माहिती बॅगच्या बाजूला छापलेली आढळेल. गाठींसाठी सिमेंटच्या बॅगची तपासणी करण्याची खात्री करावी, कारण गाठी असलेले सिमेंट बांधकामासाठी अयोग्य असते.

योग्य सिमेंट निवडण्याचा प्रयत्न करताना केवळ किंमतीमुळे प्रभावीत होऊ नका. भावताव करणे आणि थोडेसे पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात, तुम्हाला पुढे जाऊन मोठी किंमत मोजण्याचा धोका पत्करावा लागू शकतो. खरेदी करताना नामांकित कंपन्यांची तुम्ही निवड केली पाहिजे. मजबूत घर ते असते जे टिकते आणि योग्य सिमेंटची निवड कायमस्वरूपी परिणाम करू शकते.

 


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा