तुमच्या घराच्या बांधकामाच्या प्रवासातील सर्वात रोमांचक टप्पा म्हणजे घरासाठी रंग निवडणे होय. तुम्ही निवडलेले रंग मोठ्या प्रमाणात तुमच्या घराचे व्हिज्युअल आकर्षण ठरवतात. आणि असे बरेच घटक आहेत जे एक्सटिरियर होम पेंटची निवड आणि अपेक्षेवर परिणाम करतात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवण्यासारख्या आम्ही काही टिप्स आम्ही देत आहोत जेणेकरुन तुम्हाला योग्य रंग मिळतील.
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की बरेच रंग गोंधळात टाकतात. साधेपणा राखावा आणि तुमच्या घरासाठी एक किंवा कदाचित दोन एक्सटिरियर रंग निवडावेत. थोडे नीरस दिसत आहे असे वाटल्यास तुम्ही त्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा देखील शोधू शकता.
रंग निवडताना तुम्ही खरतर बरेच पर्याय चोखाळले पाहिजेत. तुमच्या रंगाच्या आवडीनुसार प्रेरणा व संदर्भांचा शोध घ्या आणि नंतर त्यांच्या कॉंबिनेशनवर काम करा. काळा आणि गडद रंग टाळा, ते सहज धूळ गोळा करतात.
शेड-कार्डावर निवडलेला रंग आणि शेड तुमच्या घराच्या बाहेरच्या भागावर लावल्यावर त्यामुळे त्यावर पडणा-या प्रकाशाच्या दर्जावर आणि प्रकारावर आधारुन खूप भिन्न दिसू शकतात. भिंतीवर काही रंग आणि रंगछटांची सॅंपल घेणे उत्तम असते, त्यामुळे ते कसे दिसतील याची चांगली कल्पना येते.
घराच्या बाहेरच्या भागाचे रंग निवडताना तुमच्या घराचे स्थान आणि त्याभोवतालचा परिसर विचारात घ्यावा. जरी तुम्हाला तुमचे घर सर्वांहून वेगळे दिसावे असे वाटत असले तरी,तुमच्या सभोवतालनुसार आणि पार्श्वभूमीप्रमाणे रंग निवडण्याचे सुनिश्चित करा.
तुमच्या घराचा बाह्यभाग फक्त दरवाजा आणि खिडक्याऐवजी फर्निचर, कलाकृती आणि झाडा झुडुपांमुळे खरोखरच सजीव होऊ शकतो. साहित्य आणि प्रकाशयोजनेची नीट निवड करा, जेणेकरून ते तुमच्या बाह्य रंगांना साजेसे दिसेल. तसेच, ट्रिम आणि अॅक्सेंट रंगांसाठी एक चांगले कलर कॉंबिनेशन निवडा
तुमच्या घराच्या एक्सटिरियर पेंटची देखभाल करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. रंगांची पर्वा न करता, पेंट्स निवडताना तुम्ही टिकाऊ आणि कमी देखभाल करणारे पेंट निवडल्याची खात्री करा. सामान्यत: 'सॅटिन' आणि ’एगशेल’ पेंट्स उत्तम टिकाऊपणा देतात आणि त्यांना सहज स्वच्छ करता येते. ते आपल्या रंगांना उत्तम फिनिश देखील देतात.
गृहनिर्माणाच्या अशा प्रकारच्या आणखीन टिप्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #गोष्ट घराची च्यासंपर्कात रहा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा