घराच्या बांधकामाचे नियोजन करत आहात का? तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या हवामानाचा विचार केला का? जर नाही, तर कृपया तो करा! कारण हवामानाच्या स्थितीच्या घटकाला सुरक्षित व स्थिर बांधकाम सुनिश्चित करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्या देशात, वेगवेगळे हवामान प्रभाग आहेत, त्या प्रत्येकाच्या हवामानाप्रमाणे मागण्या आहेत.
- सूर्यप्रकाशाने घर तापते. म्हणून छताला रंग देणे आणि हीट रिफ्लेक्टिव्ह पेंटने प्लास्टरींग केल्याने तुम्हाला ऊष्णता कमी प्रमाणात शोषण्यात मदत मिळते.
- मुख्य दार उत्तर-दक्षिण दिशेला असावे. ज्यामुळे अति सूर्यप्रकाश टाळता येतो. पश्चिमेकडच्या दिशेला असलेली दारे आणि खिडक्या टाळाव्यात.
- पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स अधिक चांगले इन्सूलेशन देतात, ज्यामुळे घरातल्या तापमानाचे नियमन होण्यात मदत मिळते.
- वायूवीजनाचे आणि क्रॉस वेंटिलेशन यंत्रांचे काळजीपूर्वक लक्षानियोजन करण्याचे लक्षात ठेवा
- दारांवर आणि खिडक्यांवर लिंटेल बीम्स उभारा
- उतरती छपरे डिझाइन करा, ज्यामुळे पाणी सहजपणे वाहून जाऊ शकते
- तुमच्या घराची संरचना वॉटरप्रूफ करण्याचे लक्षात ठेवा.
- दरवाजे आणि खिडक्या उत्तर-पश्चिम दिशेला बांधा, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ऊबदार सूर्यप्रकाश येईल.
- खिडक्या, दारे आणि फ्लोअरींग बांधताना चांगली इन्सूलेटिंग सामुग्री वापरा.
वेगवेगळ्या हवामानांमध्ये घर बांधण्याच्या या काही टिप्स होत्या.
तज्ञ बांधकाम समाधाने, टिप्सबद्दल अधिक माहितीसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा