तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
पूजेच्या खोलीसाठी वास्तुशास्त्र आणखीच महत्त्वाचे आहे, कारण यामुळे घराचे पूर्वादेश (ऑरा) आणि वास्तू ठरत असतात. वास्तुतज्ज्ञ असा आग्रह धरतात की, घरातील पूजेची खोली सकारात्मक ऊर्जेचे आणि लहरींचे केंद्र असते आणि म्हणूनच पूजेच्या खोलीसाठी वास्तू अत्यंत महत्त्वाची असते हे तुमचे घर बांधताना मनात ठेवायचे असते.
पूजेची खोली घरातील सकारात्मक आणि प्रसन्न ऊर्जांचे केंद्र म्हणून कार्य करते, कारण तुमच्या घरातील देवतांच्या अस्तित्वामुळे तिच्यातून पवित्र ऊर्जा बाहेर पडत असते. फक्त देवतांसाठी स्वतंत्र जागा, म्हणजेच पूजेची खोली देणे - मग ती कितीही लहान असो वा मोठी - तुमच्या घरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि शांत, सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्यात वास्तू महत्त्वाची भूमिका बजावीत असते आणि तुमच्या घरात कोणती ऊर्जा उत्सर्जित असते हे ठरवीत असते.
पूजेच्या खोलीमुळे केवळ चांगली कंपने निर्माण होण्यासच मदत होत नाही, तर तुम्हाला दिव्य शक्तींशी जोडले जाण्यासही मदत होते. नकारात्मक ऊर्जेचे निर्मूलन करण्यासाठी तुमचे घर आनंदाने आणि सकारात्मकतेने भरण्यासाठी वास्तू परिपूर्ण असायला हवी.
वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार पूजेच्या खोलीसाठी योग्य वास्तूमुळे तुमचे घर सकारात्मक आणि दिव्य ऊर्जेचे स्थान बनविण्यासाठी खालील उपयुक्त सूचनांची तुम्हाला मदत होईल :
पूजेची खोली ही अत्यंत पवित्र असते आणि तिची जागा वास्तूमधील तत्त्वांनुसार निश्चित केल्याने घर आनंदाने भरलेले राहते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून आणि तुमच्या पवित्र आणि आनंदी घरात नकारातमक ऊर्जेला अजिबात थारा नसावा म्हणून पूजेच्या खोलीसाठी वास्तूविषयक ह्या सर्व सूचनांचे पालन करा.
तुमच्या घरात जी ऊर्जा प्रवेश करते तिला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची योग्य स्थिती (correct positioning of the main door of your home) च्या माध्यमातून नियंत्रित करा आणि तुमच्या घराचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करा.