First slide [800x400] First slide [800x400]

आपल्या घराच्या बांधकाम साइटसाठी 5 सुरक्षित सुरक्षा उपाय

घराच्या बांधकामाच्या संदर्भात अगदी नियोजनापासून शेवटपर्यंत विचार करण्यासारखे बरेच काही असते. परंतु आपण बांधकाम प्रक्रियेत सुरक्षा या एका गोष्टीवर आपण तडजोड करू शकत नाही. संरचनेची सुरक्षितता असो, बांधकाम टिम पर्यवेक्षक किंवा साइटवर उपस्थित इतर कोणीही असो. बांधकाम साइट मुळातच उच्च जोखीमचे वातावरण आहे, जिथे कामगार विद्युत जोखमी, बांधकाम यंत्रांच्या जोखमी, आणि इतर कोणत्याही दुर्घटनांना सामोरे जाऊ शकतात

आपल्या घराच्या बांधकाम साइटसाठी या काही सुरक्षित उपाययोजना आहेत.

पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणांच्या वापराची खात्री करा.

पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणांच्या
वापराची खात्री करा

कोणत्याही बांधकाम साइटवरील कामगार, पर्यवेक्षक आणि तुमच्या स्वत: साठी ही सर्वात महत्वाची उपाययोजना आहे. कामगारांना कामाच्या प्रकारानुसार सेफ्टी हार्नेस, सेफ्टी गॉगल, हेड प्रोटेक्शन गियर आणि फॉल प्रोटेक्शन यासारख्या योग्य सुरक्षा उपकरणांची गरज असते.

1

विद्युत सुरक्षितता निश्चित करा

विद्युत अपघात हे बांधकाम साइटवरील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हाय पाव्हर उपकरणे, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर्स आणि लांब केबल्सचा वापर त्याला धोकादायक बनवितो आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना योग्यरित्या हाताळणे आवश्यक आहे.

2

बांधकाम साइटवर विद्युत सुरक्षा सुनिश्चित
करण्यासाठीच्या टिपा

1

ओव्हरहेड आणि भूमिगत ट्रान्समिशन केबल्स आणि पाइप्सपासून सुरक्षित अंतर राखावे.

2

सर्व विद्युत उत्पादने आणि केबल्स इन्सुलेटेड असल्या पाहिजेत. आजूबाजूला खुल्या तारा पडलेल्या नसाव्यात.

3

सर्व विद्युत जोडण्या थ्री पॉइंट ग्राउंडिंग प्लग वापरुन ग्राउंड केल्या पाहिजेत.

4

चढउतार आणि ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी, विशेषत: अनेक विस्तार वापरताना उर्जा वापराचे नियमन केले जावे

 

कडक सुरक्षा आणि सुरक्षा प्रॉक्टोकॉलच्या कार्यान्वयाची शाश्वती करावी

 

कडक सुरक्षा आणि सुरक्षा प्रॉक्टोकॉलच्या कार्यान्वयाची शाश्वती करावी

कामगार, साहित्य आणि यंत्रसामुग्रीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बांधकाम साइटवर प्रवेश मर्यादित असावा आणि केवळ अधिकृत व्यक्तींना परवानगी देण्यात यावी. बांधकाम साइटच्या संभाव्य धोक्यांपासून शेजार्‍यांच्या आणि पादचा-यांच्या सुरक्षेची काळजी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि योग्य सुरक्षा उपायांचा कार्यान्वय करावा.

3

 

सर्व बांधकाम साहित्य सुरक्षितपणे संग्रहित केल्याची खात्री करावी

 

सर्व बांधकाम साहित्य सुरक्षितपणे संग्रहित केल्याची खात्री करावी

सुरक्षितता आणि योग्य हाताळणी लक्षात घेऊन बांधकाम साइटवरील सर्व साहित्य, विशेषत: रसायने आणि यंत्रणा सावधगिरीने संग्रहित करव्यात आणि वापराव्यात. सामुग्रीच्या विशेषत: ज्वलनशील पदार्थांच्या मिसळण्यामुळे आग, स्फोट आणि गंभीर इजा होऊ शकतात

4

 

दुर्दैवी पर्यावरणात्मक स्थितींसाठी नियोजन आणि तयारी करावी

 

दुर्दैवी पर्यावरणात्मक स्थितींसाठी नियोजन आणि तयारी करावी

सर्व काही नियोजनाप्रमाणे होत नाही, हे वास्तव आहे तुमच्या प्रदेशानुसार अपेक्षित पाऊस किंवा इतर प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीसाठी तयार रहा, जेणेकरून बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही दुर्घटना किंवा अपघात होऊ नयेत.

5

दिवसाच्या शेवटी, तुमचे घर तुम्ही निवडलेल्या साहित्याएवढेच आणि सुरक्षित बांधकामासाठी उचललेल्या पावलांइतकेच सुरक्षित असायला हवे.

घर बनवते आणि टिप्स अल्ट्राटेक सीमेंट द्वारे #घराची गोष्ट   बनते

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...